शनिवारी १८० कोरोनाबाधितांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:11 AM2021-02-07T04:11:41+5:302021-02-07T04:11:41+5:30
पुणे : शहरात शनिवारी १८० कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, २६५ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ३ हजार २३९ ...
पुणे : शहरात शनिवारी १८० कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, २६५ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ३ हजार २३९ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ५.५ टक्के इतकी आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये ११२ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, आॅक्सिजनसह उपचार घेणाऱ्याची संख्या २१२ इतकी आहे़
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या १ हजार ४०७ इतकी आहेत. आज दिवसभरात एकही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नाही,
शहरात आजपर्यंत १० लाख ४७ हजार ६६१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ९२ हजार ९८२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ८६ हजार ८०१ जण कोरोनामुक्त झाले आहेत़
==========================