शुक्रवारी १९५ कोरोनाबाधितांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:18 AM2021-02-06T04:18:31+5:302021-02-06T04:18:31+5:30
पुणे : शहरात शुक्रवारी १९५ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, २२४ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ३ हजार ३५७ ...
पुणे : शहरात शुक्रवारी १९५ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, २२४ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ३ हजार ३५७ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ५.८ टक्के इतकी आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रुग्णांलयांमध्ये ११० गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्याची संख्या २१० इतकी आहे़
शहरातील सक्रिय रूग्णसंख्या १ हजार ४९२ इतकी आहेत. आज दिवसभरात २ जणांचा मृत्यू झाला असून, शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ७७४ इतकी झाली आहे़
शहरात आजपर्यंत १० लाख ४४ हजार ४२२ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ९२ हजार ८०२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ८६ हजार ५३६ जण कोरोनामुक्त झाले आहेत़
==========================