सोमवारी १९६ कोरोनाबाधितांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:28 AM2020-12-15T04:28:42+5:302020-12-15T04:28:42+5:30
पुणे : शहरात सोमवारी १९६ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. २५७ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ दिवसभरात १ हजार ९२१ ...
पुणे : शहरात सोमवारी १९६ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. २५७ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ दिवसभरात १ हजार ९२१ संशयितांची तपासणी केली़ तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही १०़२० टक्के इतकी आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये ३८६ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू आहे. यापैकी २२४ जण व्हेंटिलेटरवर आहेत़ तर शहरातील ऑक्सिजनसह उपचार घेणाºयांची संख्या एक हजाराच्या आत कायम असून, आजमितीला ही संख्या ७९६ इतकी आहे़
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ५ हजार ५९ इतकी आहे़ आज दिवसभरात १० जणांचा मृत्यू झाला आहे. यातील ५ जण पुण्याबाहेरील आहे़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ५४३ इतकी झाली आहे़
शहरात आजपर्यंत ८ लाख ६६ हजार ३०१ जणांची कोरोना तपासणी केली आहे. यापैकी १ लाख ७४ हजार २०९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी १ लाख ६४ हजार ६०७ जण कोरोनामुक्त झाले आहेत़