गुरुवारी २२७ कोरोनाबाधितांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:11 AM2021-01-22T04:11:12+5:302021-01-22T04:11:12+5:30
पुणे : शहरात गुरुवारी २२७ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ३०४ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ३ हजार ...
पुणे : शहरात गुरुवारी २२७ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ३०४ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ३ हजार ४८७ संशयितांची तपासणी करण्यात आली़ तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ६़ ५ टक्के इतकी आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रुग्णांलयांमध्ये २०५ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असून, आॅक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २९५ इतकी आहे़
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या २ हजार १७३ इतकी आहेत़ आज दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ७२५ इतकी झाली आहे़
शहरात आजपर्यंत ९ लाख ९२ हजार ८४३ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ८४ हजार १४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी १ लाख ७७ हजार ११६ जण कोरोनामुक्त झाले आहेत़
==========================