गुरुवारी २२८ कोरोनाबाधितांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:16 AM2021-02-06T04:16:23+5:302021-02-06T04:16:23+5:30
पुणे : शहरात गुरुवारी २२८ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ३२८ कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ३ हजार ८८६ ...
पुणे : शहरात गुरुवारी २२८ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ३२८ कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ३ हजार ८८६ संशयितांची तपासणी करण्यात आली़ तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ५़ ८६ टक्के इतकी आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार : सायंकाळी पाचपर्यंत शहरातील विविध रुग्णालयांमध्ये १०९ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २०४ इतकी आहे़ आज दिवसभरात ६ जणाचा मृत्यू झाला असून, यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ७७२ इतकी झाली आहे़ शहरातील सक्रिय रुग्ण संख्या ही आजमितीला १ हजार ५२३ इतकी आहे़
शहरात आजपर्यंत १० लाख ४१ हजार ६५ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ९२ हजार ६०७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी १ लाख ८६ हजार ३१२ जण कोरोनामुक्त झाले आहेत़
==========================