दिवसभरात २५८ कोरोनाबाधितांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:28 AM2020-12-11T04:28:10+5:302020-12-11T04:28:10+5:30
पुणे : शहरात गुरूवारी २५८ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, २५५ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ३ हजार ७९५ ...
पुणे : शहरात गुरूवारी २५८ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, २५५ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ३ हजार ७९५ संशयितांची तपासणी करण्यात आली़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेचारपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये ४१३ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी २३७ जण व्हेंटिलेटरवर आहेत़ तर १ हजार ५५ जणांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू आहेत़ शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ५ हजार ८२ इतकी आहे़ आज दिवसभरात १० जणांचा मृत्यू झाला असून, यातील २ जण पुण्याबाहेरील आहे़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ५२२ इतकी झाली आहे़
शहरात आजपर्यंत ८ लाख ५२ हजार ८०१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ७३ हजार १५५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी १ लाख ६३ हजार ५५१ जण कोरोनामुक्त झाले आहेत़
==========================