गुरुवारी २५९ कोरोनाबाधितांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:10 AM2021-01-15T04:10:45+5:302021-01-15T04:10:45+5:30
पुणे : शहरात गुरुवारी २५९ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ३८० कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ३ हजार ...
पुणे : शहरात गुरुवारी २५९ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ३८० कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ३ हजार ५९१ संशयितांची तपासणी करण्यात आली़ तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हीटीची टक्केवारी ही ७़ २१ टक्के इतकी आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार: सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रुग्णालयांमध्ये २०८ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असून, ॲाक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २७९ इतकी आहे़
शहरातील सक्रिय रुग्ण संख्या २ हजार ६०१ इतकी आहेत़ आज दिवसभरात ६ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ६९३ इतकी झाली आहे़
शहरात आजपर्यंत ९ लाख ७१ हजार ७०७ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ८२ हजार ४४८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी १ लाख ७५ हजार १५४ जण कोरोनामुक्त झाले आहेत़
==========================