मंगळवारी २७९ कोरोनाबाधितांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:10 AM2020-12-09T04:10:35+5:302020-12-09T04:10:35+5:30
पुणे : शहरात मंगळवारी २७९ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, २२० कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात २ हजार ४२५ ...
पुणे : शहरात मंगळवारी २७९ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, २२० कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात २ हजार ४२५ संशयितांची तपासणी केली़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये ४१२ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी २४७ जण व्हेंटिलेटरवर आहेत़ तर १ हजार १२८ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत़ शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ५ हजार ७० इतकी आहे़ आज दिवसभरात ११ जणांचा मृत्यू झाला असून, यातील ३ जण पुण्याबाहेरील आहे़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ५१० इतकी झाली आहे़
शहरात आजपर्यंत ८ लाख ४५ हजार २९८ जणांची कोरोना तपासणी केली आहे. यापैकी १ लाख ७२ हजार ५५९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी १ लाख ६२ हजार ९७९ जण कोरोनामुक्त झाले आहेत़