बुधवारी २८२ कोरोनाबाधितांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:12 AM2020-12-31T04:12:02+5:302020-12-31T04:12:02+5:30
पुणे : शहरात बुधवारी २८२ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ३४९ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ४ हजार २३ ...
पुणे : शहरात बुधवारी २८२ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ३४९ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ४ हजार २३ संशयितांची तपासणी केली़ तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ७ टक्के इतकी आहे़
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये २४२ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी १४५ जण व्हेंटिलेटरवर आहेत़ तर शहरातील ऑक्सिजनसह उपचार घेणाºयांची संख्या ६४९ इतकी आहे़
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ३ हजार ५१४ इतकी आहेत़ आज दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ६२६ इतकी झाली आहे़
शहरात आजपर्यंत ९ लाख १३ हजार ३७६ जणांची कोरोना तपासणी केली आहे. यापैकी १ लाख ७८ हजार ५४० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी १ लाख ७० हजार ४०० जण कोरोनामुक्त झाले आहेत़