Pune Corona News: पुणे शहरात रविवारी २ हजार ९०० नव्या कोरोनाबाधितांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 08:27 PM2021-03-21T20:27:36+5:302021-03-21T20:28:11+5:30
तपासणीच्या तुलनेत टक्केवारी २२.४३ टक्के
शहरात कोरोनाबाधितांची वाढ कायम असून, रविवारी नव्याने २ हजार ९०० रूग्णांची भर पडली आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशीही १२ हजार ९२९ जणांनी कोरोना तपासणी करून घेतली आहे. तपासणीच्या तुलनेत आज २२़.४३ टक्के रूग्ण हे कोरोनाबाधित आढळून आले आहेत़.
पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २२ हजार ५२४ इतकी झाली आहे. सध्या शहरात ५१९ गंभीर कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहे. ९५५ रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार चालू आहेत. आज दिवसभरात १ हजार २४५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान आज दिवसभरात २८ जणांचा मृत्यू झाला असून यापैकी ८ जण हे पुण्याबाहेरील आहेत़
शहरात आजपर्यंत १३ लाख २६ हजार ७९९ जणांची कोरोना तपासणी केली आहे. यापैकी २ लाख ३५ हजार ३९४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २ लाख ७ हजार ८१७ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ५ हजार ५३ इतकी झाली आहे.