रविवारी शहरात २९२ कोरोनाबाधितांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:06 AM2020-12-28T04:06:57+5:302020-12-28T04:06:57+5:30
पुणे : शहरात रविवारी २९२ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. ४७० कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात २ हजार ८८३ ...
पुणे : शहरात रविवारी २९२ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. ४७० कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात २ हजार ८८३ संशयितांची तपासणी केली. तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही १०.१२ टक्के इतकी आहे़
महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेचारपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये ३८७ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू आहे. यापैकी २२६ जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर शहरातील ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्याची संख्या ८५८ इतकी आहे़
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ४ हजार ९७ इतकी आहेत़ आज दिवसभरात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ६१३ इतकी झाली आहे़
शहरात आजपर्यंत ९ लाख ४ हजार ६८९ जणांची कोरोना तपासणी केली आहे. यापैकी १ लाख ७७ हजार ८७२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ६९ हजार १६२ जण कोरोनामुक्त झाले आहेत़