बुधवारी ३१४ कोरोनाबाधितांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:10 AM2021-01-14T04:10:04+5:302021-01-14T04:10:04+5:30
पुणे : शहरात बुधवारी ३१४ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, २४६ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ३ हजार ९०७ ...
पुणे : शहरात बुधवारी ३१४ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, २४६ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ३ हजार ९०७ संशयितांची तपासणी केली. तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ८ टक्के इतकी आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सहापर्यंत शहरातील विविध रुग्णालयांमध्ये २१२ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहे. ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्याची संख्या २८७ इतकी आहे़
शहरातील सक्रिय रुग्ण संख्या २ हजार ७२५ इतकी आहेत. आज दिवसभरात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. २ जण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ६९० इतकी झाली आहे़
शहरात आजपर्यंत ९ लाख ६८ हजार ११६ जणांची कोरोना तपासणी केली आहे. यापैकी १ लाख ८२ हजार १८९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ७४ हजार ७७४ जण कोरोनामुक्त झाले आहेत़