दिवसभरात ३२८ कोरोनाबाधितांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:17 AM2021-02-23T04:17:51+5:302021-02-23T04:17:51+5:30
पुणे : शहरात कोरोनाबाधितांची वाढ दिवसागणिक वाढतच चालली असताना, रविवारी ६३४ वर गेलेला कोरोना रूग्णांचा आकडा सोमवारी निम्म्याच्या आसपास ...
पुणे : शहरात कोरोनाबाधितांची वाढ दिवसागणिक वाढतच चालली असताना, रविवारी ६३४ वर गेलेला कोरोना रूग्णांचा आकडा सोमवारी निम्म्याच्या आसपास आला. सोमवारी ३२८ नवीन कोरोना आढळून आले. कोरोना संशयितांचे प्रमाण चार हजाराच्या पुढे गेले आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सहा वाजेपर्यंत शहरात ४ हजार ४१४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली़ यापैकी ३२८ जण पॉझिटिव्ह आले असून, तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी ७़ ४३ टक्के इतकी आहे़ शहरातील विविध रूग्णालयांत आॅक्सिजनसह उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या आजमितीला ३७९ इतकी असून, शहरातील गंभीर रूग्णसंख्या ही १७२ इतकी आहे़ दरम्यान आज दिवसभरात ३१८ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले असून, शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार ९०२ इतकी झाली आहे़
शहरात आजपर्यंत ११ लाख ३ हजार ५४८ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ९८ हजार २९२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ९० हजार ५६० जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ११ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ७ जण पुण्याबाहेरील आहेत़ आजपर्यंत शहरात कोरोनामुळे ४ हजार ८३० जणांचा मृत्यू झाला आहे़
==========================