शहरात मंगळवारी ५ हजार ३१३ कोरोनाबाधितांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:10 AM2021-04-14T04:10:57+5:302021-04-14T04:10:57+5:30
पुणे : शहरात कोरोनाबाधितांच्या वाढीचा आकडा मंगळवारीही कायम असून, आज दिवसभरात नव्याने ५ हजार ३१३ कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ ...
पुणे : शहरात कोरोनाबाधितांच्या वाढीचा आकडा मंगळवारीही कायम असून, आज दिवसभरात नव्याने ५ हजार ३१३ कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केद्रांवर २१ हजार १६६ संशयितांनी आपली तपासणी करून घेतली आहे़ तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही २५.१० टक्के इतकी आहे़
दरम्यान, आज दिवसभरात शहरात सर्वाधिक कोरोनाबधितांचा मृत्यू झाला आहे. शहरातील ५५ जणांचा, तर शहराबाहेरील परंतु पुण्यात उपचार घेणाऱ्या १८ अशा ७३ जणांचा मृत्यू झाला आहे़. आज शहरातील कोरोनाबाधितांच्या तुलनेत मृत्यूची टक्केवारी ही गुरुवारी १.७२ टक्के इतकी आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या ५ हजार १८१ जणांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू आहेत़ तर १ हजार ८६ रूग्ण हे गंभीर आहेत़ आज दिवसभरात ४ हजार ५७३ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ सध्या शहरात ५४ हजार ६१ सक्रिय रूग्ण आहेत़
शहरात आजपर्यंत १७ लाख ६५ हजार ३४६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ३ लाख ३९ हजार ८२३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २ लाख ८८ हजार ९०६ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ५ हजार ८५६ झाली आहे़
==========================