गुरुवारी ५ हजार ३९५ रुग्णांची वाढ : ४ हजार ३२१ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:11 AM2021-04-16T04:11:04+5:302021-04-16T04:11:04+5:30
पुणे : शहरात गुरूवारी नव्याने ५ हजार ३९५ कोरोनाग्रस्त आढळून आले असून, ४ हजार ३२१ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ ...
पुणे : शहरात गुरूवारी नव्याने ५ हजार ३९५ कोरोनाग्रस्त आढळून आले असून, ४ हजार ३२१ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात २१ हजार ९२२ जणांनी कोरोना तपासणी केली असून, तपासणीच्या तुलनेत आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची टक्केवारी ही २४़ ६० टक्के इतकी आहे़
दरम्यान, आज दिवसभरात ६८ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १९ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १़ ७० टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ५ हजार ४७८ कोरोनाबाधित रूग्ण हे आॅक्सिजनवर उपचार घेत असून, १ हजार १७२ रूग्ण हे गंभीर आहेत़ शहरात आत्तापर्यंत १८ लाख ८० हजार ५९३ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ३ लाख ४९ हजार ४२४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ तर यापैकी २ लाख ८९ हजार १२२ कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील सक्रिय रुग्णसंख्या ही सद्यस्थितीला ५४ हजार ३५१ इतकी आहे़
--------------------------