शुक्रवारी ५७३ कोरोनाबाधितांची वाढ : ९९९ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:09 AM2021-05-29T04:09:40+5:302021-05-29T04:09:40+5:30
पुणे : शहरात शुक्रवारी ५७३ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ९९९ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात विविध तपासणी केंद्रांवर ...
पुणे : शहरात शुक्रवारी ५७३ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ९९९ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात विविध तपासणी केंद्रांवर झालेल्या ८ हजार २०० तपासण्यांमध्ये, कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ६़ ९८ टक्के इतकी आहे़ शहरातील सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७ हजार ५३५ इतकी आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात आज ४१ जणांचा मृत्यू झाला़ यापैकी १२ जण हे पुण्याबाहेरील असून, आजचा मृत्यूदर हा १़ ७४ टक्के इतका आहे़
शहरातील विविध रुग्णालयांमध्ये १ हजार ६८७ जणांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू असून, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही ९८१ इतकी आहे़ शहरात आत्तापर्यंत २४ लाख ७६ हजार ९०९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ६८ हजार ७०२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ तर यापैकी ४ लाख ५२ हजार ९९० जण कोरोनामुक्त झाले आहेत़ तर आतापर्यंत शहरात ८ हजार १७७ जणांचा मृत्यू झाला आहे़
-----------