दिवसभरात ६३४ रुग्णांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:14 AM2021-02-23T04:14:41+5:302021-02-23T04:14:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये रविवारी दिवसभरात ६३४ रुग्णांची वाढ झाली. तर, बरे झालेल्या २९४ रुग्णांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये रविवारी दिवसभरात ६३४ रुग्णांची वाढ झाली. तर, बरे झालेल्या २९४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील १६४ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या २ हजार ८९६ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १६४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ३५० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ५ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ८२६ झाली आहे.
दिवसभरात एकूण २९४ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ९० हजार २४२ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ९७ हजार ९६४ झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार ८९६ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ४ हजार ७०७ नागरिकांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून, आतापर्यंत १० लाख ९९ हजार १३४ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.