मंगळवारी ७३९ कोरोनाबाधितांची वाढ : १ हजार ५६० कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:11 AM2021-05-26T04:11:23+5:302021-05-26T04:11:23+5:30
पुणे : कोरोनाबाधितांची संख्या मंगळवारी पुन्हा पाचशेच्यावर गेली असून, दिवसभरात ७३९ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ विविध तपासणी ...
पुणे : कोरोनाबाधितांची संख्या मंगळवारी पुन्हा पाचशेच्यावर गेली असून, दिवसभरात ७३९ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ विविध तपासणी केंद्रांवर झालेल्या ७ हजार ७३७ तपासण्यांमध्ये कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ९़ ५५ टक्के इतकी आहे़ शहरात आज दिवभरात १ हजार ५६० जण कोरोनामुक्त झाले असून, शहरातील सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८ हजार ८६८ इतकी आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात आज ४९ जणांचा मृत्यू झाला़ यापैकी १४ जण हे पुण्याबाहेरील असून, आजचा मृत्यूदर हा १़ ७३ टक्के इतका आहे़
शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या २ हजार २२४ जणांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू आहेत़ तर गंभीर रूग्णसंख्याही १ हजार ३२ इतकी आहे़ शहरात आत्तापर्यंत २४ लाख ५१ हजार ७६५ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ६६ हजार ८५८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ तर यापैकी ४ लाख ४९ हजार ९१२ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ तर आतापर्यंत शहरात ८ हजार ७८ जणांचा मृत्यू झाला आहे़
-----------