सोमवारी ७५३ कोरोनाबाधितांची वाढ : ७०० कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:13 AM2021-03-09T04:13:39+5:302021-03-09T04:13:39+5:30
पुणे : शहरात सोमवारी ७५३ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, आज गेल्या काही दिवसात प्रथमच सर्वाधिक म्हणजे ७०० कोरोनाबाधित ...
पुणे : शहरात सोमवारी ७५३ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, आज गेल्या काही दिवसात प्रथमच सर्वाधिक म्हणजे ७०० कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील विविध प्रयोगशाळांमध्ये दिवसभरात ६ हजार ५३४ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत पॉझिटिव्ह रूग्णांची टक्केवारी ही ११़५२ टक्के इतकी आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सहावाजेपर्यंत शहरातील विविध रूग्णालयांत आॅक्सिजनसह उपचार घेणाºया कोरोनाबाधितांची संख्या ६९० इतकी असून, शहरातील गंभीर रूग्णसंख्या ही ३५८ आहे़ तर शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही ६ हजार ७३५ इतकी झाली आहे़
शहरात आजपर्यंत ११ लाख ९८ हजार ५३६ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख ९ हजार ८३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ९६ हजार ७५१ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १ जण पुण्याबाहेरील आहेत़ आजपर्यंत शहरात कोरोनामुळे ४ हजार ८९५ जणांचा मृत्यू झाला आहे़
==========================