खंडणी प्रकरणातील दोघांच्या कोठडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:15 AM2021-03-04T04:15:44+5:302021-03-04T04:15:44+5:30

पुणे : जीवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ करीत २० हजारांची खंडणी उकळणा-या दोघांच्या पोलीस कोठडीत ३ मार्चपर्यंत वाढ करण्यात ...

Increase in the custody of both in the ransom case | खंडणी प्रकरणातील दोघांच्या कोठडीत वाढ

खंडणी प्रकरणातील दोघांच्या कोठडीत वाढ

Next

पुणे : जीवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ करीत २० हजारांची खंडणी उकळणा-या दोघांच्या पोलीस कोठडीत ३ मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

वैभव राजाराम ढमाले (वय २२), ओंकार रामदास मेमाणे (वय २६, दोघेही रा. नेरे) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत, दशरथ तुकाराम कसबे (वय ३१) यांनी फिर्याद दिली आहे. ११ मे २०२० ते २३ फेब्रुवारी २०२१ दरम्यान ही घटना घडली. यादरम्यान, आरोपींनी रोख तसेच गुगल पेद्वारे २० हजारांची रक्कम घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असून गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सहाय्यक सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

......

Web Title: Increase in the custody of both in the ransom case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.