उजनी धरणाच्या पातळीत वाढ

By admin | Published: July 17, 2017 03:58 AM2017-07-17T03:58:02+5:302017-07-17T03:58:02+5:30

जिल्ह्यातील भीमा नदीच्या खोऱ्यात होत असलेल्या पावसामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.

Increase in level of Ujani damages | उजनी धरणाच्या पातळीत वाढ

उजनी धरणाच्या पातळीत वाढ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भिगवण : जिल्ह्यातील भीमा नदीच्या खोऱ्यात होत असलेल्या पावसामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. दोन दिवसांत साठ्यात वाढ झाल्याची माहिती उजनी धरण प्रशासनाकडून देण्यात आली. दोन दिवस असाच पाऊस राहिला तर धरणाची पातळी उणे पातळीतून अधिकवर जाईल, अशी शक्यता धरण व्यवस्थापनाकडून व्यक्त करण्यात आली.
पुणे, लोणावळा, भीमाशंकर, आंबेगाव, शिरूर या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र उजनी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने अद्याप दडी मारलेली आहे. बंडगार्डन येथून २० हजार पाण्याचा विसर्ग भीमा नदीत होत आहे. दौंड येथून २७ हजार क्युसेक्सवेगाने पाणी भीमा नदीपात्रात येत आहे. यामुळे उजनीतील पाणीसाठा वाढलो. दोन दिवसांपूर्वी उजनी धरणातील पाणीसाठा वजा १६ टक्केपर्यंत होता. मात्र आजच्या आकडेवारीनुसार वजा १२.८३ पर्यंत पाणीसाठा वाढला आहे.
दोन दिवस पावसाचा असाच जोर राहिला तर उजनीची पातळी मृत साठ्यातून बाहेर येण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात आली. धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ११७ टीएमसी आहे. उपयुक्त पातळी ५३ टीएमसी इतकी आहे. धरणातील आजची पाणीपातळी ४८९.९९० मीटर आहे.
पुणे आणि दौंड भागातून होत असलेल्या विसर्गामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपले विद्युत पंप सुरक्षित पाण्यापासून वाचविण्यासाठी लगबग सुरु केल्याचे पाहावयास मिळत आहे.
यामुळे उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गतवर्षी उजनी धरण शंभर टक्के भरले होते. धरणावर अवलंबून असणाऱ्या पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा झाला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
चासकमान : खेड तालुक्याच्या पश्चिम भागात सह्याद्रीच्या डोंगरावर भीमाशंकर, भोरगिरी, कळमोडी धरण परिसरात तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्यामुळे ओढे, नाले, बंधारे, वाहून सखल भागात पाणी साचले आहे. रात्रभर पडलेल्या या पावसाने भीमा नदीच्या पातळीत प्रचंड प्रमाणात वाढ होऊन नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे चासकमान धरणाची पाणीपातळी वाढली असून, धरणात ६९.८० टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणातून ४५० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. पावसामुळे भातलागवडीला वेग आला आहे.
चासकमान धरणामध्ये मागील वर्षी याच तारखेला ५५.०६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. पाणी पातळी ६४३.३० होती. एकूण साठा १४५.३१ दलघमी होता. उपयुक्त पाणीसाठा ११८.१२ दलघमी होता.

Web Title: Increase in level of Ujani damages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.