कांद्याची आवक घटल्याने बाजारभावात वाढ, पालेभाज्यांच्या भावात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:07 AM2021-06-28T04:07:58+5:302021-06-28T04:07:58+5:30
पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर व शेपू भाजीची आवक घटल्याने भावात वाढ झाली. जनावरांच्या बाजारात बैल, जर्शी गाय, म्हैस व ...
पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर व शेपू भाजीची आवक घटल्याने भावात वाढ झाली.
जनावरांच्या बाजारात बैल, जर्शी गाय, म्हैस व शेळ्या-मेंढ्यांच्या संख्येत संख्येत वाढ झाली. बकरी ईदमुळे बोकडांच्या खरेदी-विक्रीत वाढ झाली.
एकूण उलाढाल १ कोटी ९० लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ९०० क्विंटल झाली. मागील शनिवारच्या तुलनेत २०० क्विंटलने कमी झाल्याने भावात २०० रुपयांची वाढ झाली. कांद्याचे बाजारभाव १,८०० रुपयांवरून २००० पोहोचले. तळेगाव बटाट्याची एकूण १,२५० आवक क्विंटल झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत आवक ५० क्विंटलने वाढल्याने १०० रुपयांनी भाव घटले.
बटाट्याचा बाजारभाव १,७०० रुपयांवरून १,६०० रुपयांवर आले. लसणाची एकूण आवक १५ क्विंटल झाली. लसणाचा ९,००० रुपये बाजारभाव मिळाला. भुईमूग शेंगांची ६ क्विंटलची आवक झाल्याने भाव ६,००० रुपये मिळाला.
चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक २४९ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला २,५०० ते ३,५०० रुपये असा भाव मिळाला.
शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढील प्रमाणे:
कांदा - एकूण आवक - ९०० क्विंटल. भाव क्रमांक १. २,००० रुपये, भाव क्रमांक २. १,६०० रुपये, भाव क्रमांक ३. १,२०० रुपये.
बटाटा - एकूण आवक - १,२५० क्विंटल. भाव क्रमांक १. १,६०० रुपये, भाव क्रमांक २. १,३०० रुपये, भाव क्रमांक ३. ९०० रुपये.
फळभाज्या :
चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती दहा किलोंसाठी डागांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे -
टोमॅटो - १६३ पेट्या ( ४०० ते ८०० रु. ). कोबी - १३२ पोती ( ५०० ते ९०० रु. ). फ्लॉवर - ४५८ पोती ( ५०० ते १,००० रु.). वांगी - ४४ पोती ( ४,००० ते ५,००० रु.). भेंडी - ५४ पोती ( २,५०० ते ३,५०० रु.). दोडका - २. पोती ( ५,००० ते ६,००० रु.). कारली - ५२ डाग ( ३,००० ते ४,००० रु.). दुधीभोपळा - ४४ पोती (१,००० ते २,००० रु.),काकडी - ४६ पोती ( १,००० ते २,००० रु.). फरशी - १. पोती ( ८,००० ते ९,००० रु.). वालवड - १ पोती ( ४,००० ते ६,००० रु.). गवार - ५४ पोती ( ४,००० ते ५,००० रु.). ढोबळी मिरची - ४७ डाग ( २,००० ते ३,००० रु.). चवळी - १ पोती ( २,५००) ते ३,५०० रु.). वाटाणा - २ पोती ( ६,००० ते ८,००० रु. ). शेवगा - ८ पोती ( ४,००० ते ६,००० रु.). गाजर - ६२ पोती ( १,००० ते २,००० रु.).
पालेभाज्या: राजगुरुनगर येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात मेथीची १५ हजार जुड्यांची आवक होऊन मेथीला १,००० ते २,५०० रुपये प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबिरीची २. हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा जुड्यांना ५०० ते २,००० रुपये एवढा भाव मिळाला. शेपूची ६००० जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ४०० ते १,१५० रुपये भाव मिळाला. पालकची काहीही आवक झाली नाही.
चाकण येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रति शेकडा जुड्यांना मिळालेले भाव: मेथी - एकूण १. हजार ९५० जुड्या ( १,००० ते १,५०० रुपये ). कोथिंबीर - एकूण ३. हजार २५० जुड्या ( ५०० ते १,००० रुपये ). शेपू - एकूण ३ हजार ६५० जुड्या ( ८०० ते १,००० रुपये ). पालक - एकूण ४ हजार २३० जुड्या ( ४०० ते ६०० रुपये ).
जनावरे:
चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ६० जर्शी गाईंपैकी ४५ गाईंची विक्री झाली. ( १२,००० ते ६,५००० रुपये ). २०५ बैलांपैकी १६५ बैलांची विक्री झाली.( १०,००० ते ३,५००० रुपये ). १५० म्हशींपैकी १०० म्हशींची विक्री झाली. ( २०,००० ते ७,०००० रुपये ). शेळ्या - मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ६३१० शेळ्या - मेंढ्यापैकी ५३४० मेंढ्यांची विक्री झाली.
चाकण बाजारातील आडतदार संतोष खैरे यांच्या गाळ्यावर भेंडीची मोठी आवक झाली.