मराठवाड्यातील किमान तापमानात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 05:27 AM2017-11-07T05:27:42+5:302017-11-07T05:28:15+5:30
दोन दिवसांच्या तुलनेत कोकणासह विदर्भ मराठवाड्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे. सोमवारी सर्वात कमी तापमान अहमदनगर येथे १३़६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़
पुणे : दोन दिवसांच्या तुलनेत कोकणासह विदर्भ मराठवाड्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे. सोमवारी सर्वात कमी तापमान अहमदनगर येथे १३़६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़
पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून किमान तापमानात वाढ होऊन ते १७ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते़ त्यानंतर पुढील तीन दिवस मोठी घट होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला.
प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) :
पुणे १५़९, अहमदनगर १३़६, जळगाव १५़४, कोल्हापूर २०़६, महाबळेश्वर १६़४, मालेगाव १५़८, नाशिक १४, सांगली २०़२, सातारा १८, मुंबई २५़२, सातांक्रुझ २३़२, अलिबाग २३़४, रत्नागिरी २४़१, पणजी २५, डहाणू २१़९, भिरा २३, औरंगाबाद १५़४, परभणी १४़९, नांदेड १७, बीड १६़४, अकोला १६़२, अमरावती १७़४, बुलढाणा १६़४, ब्रम्हपुरी १५़९, चंद्रपूर १७़६, गोंदिया १५़२, नागपूर १५, वाशिम १५, वर्धा १५़८, यवतमाळ १४़