विनातिकीट रेल्वे प्रवाशांच्या संख्येत वाढ; ८२ हजार जणांवर कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 12:14 PM2017-11-07T12:14:01+5:302017-11-07T12:17:57+5:30

पुणे रेल्वे विभागात विनातिकीट रेल्वे प्रवास करणार्‍यांमध्ये या वर्षभरात वाढ झाली असून एप्रिल ते आॅक्टोबर या कालावधीत तब्बल ८२ हजार ५०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे़

Increase the number of without ticket train passengers; Action on 82 thousand people | विनातिकीट रेल्वे प्रवाशांच्या संख्येत वाढ; ८२ हजार जणांवर कारवाई 

विनातिकीट रेल्वे प्रवाशांच्या संख्येत वाढ; ८२ हजार जणांवर कारवाई 

Next
ठळक मुद्देआॅक्टोबरमध्ये सर्वाधिक कारवाई; ३३ हजार ५८ प्रकरणांत १ कोटी ८६ लाख रुपये दंड वसूलकारवाई वरिष्ठ मंडळ प्रबंधक कृष्णात पाटील यांच्या नेतृत्वात तिकीट निरीक्षकांच्या पथकाने केली

पुणे : पुणे रेल्वे विभागात विनातिकीट रेल्वे प्रवास करणार्‍यांमध्ये या वर्षभरात वाढ झाली असून एप्रिल ते आॅक्टोबर या कालावधीत तब्बल ८२ हजार ५०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे़ त्यांच्याकडून ४ कोटी ८२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़ 
याशिवाय अनियमितपणे प्रवास करणारे ७७ हजार प्रवासी, तसेच सामानाची नोंदणी न करताना घेऊन जाणार्‍या १२ हजार ५०० जणांवर कारवाई करण्यात आली़ सर्व प्रकारे नियमांचे उल्लंघन करणार्‍या १ लाख ७२ हजार प्रकरणांत एकूण ९ कोटी २७ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला़ 
आॅक्टोबरमध्ये सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे़ आॅक्टोबरमध्ये ३३ हजार ५८ प्रकरणांत १ कोटी ८६ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला़ गेल्या वर्षी आॅक्टोबर २०१६ मध्ये ३१ हजार २०१ प्रकरणांत १ कोटी ७५ लाख ६५ हजार रुपये दंड वसूल झाला होता़ 
एप्रिल २०१५ मध्ये पुणे विभागात २९ हजार ४० प्रकरणांत १ कोटी ८० लाख ५८ हजार दंड करण्यात आला होता़ ही कारवाई विभागाचे वरिष्ठ मंडळ प्रबंधक कृष्णात पाटील यांच्या नेतृत्वाखाली तिकीट निरीक्षकांच्या पथकाने केली आहे़ 

Web Title: Increase the number of without ticket train passengers; Action on 82 thousand people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.