चाकण बाजारात कांद्याच्या भावात वाढ
By admin | Published: January 9, 2017 02:15 AM2017-01-09T02:15:10+5:302017-01-09T02:15:10+5:30
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढून भावात वाढ झाली
चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढून भावात वाढ झाली आहे. ही आवक ६८० क्विंटलने वाढली आहे, तर बटाट्याच्या भावात व आवकेमध्ये घसरण झाली आहे. बाजाराची एकूण उलाढाल २ कोटी ४८ लाख रुपये झाली असल्याची माहिती सचिव सतीश चांभारे यांनी दिली.
कांद्याला या आठवड्यात ४०० ते ८५० रुपये असा प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल भाव मिळाला. चाकणमध्ये कांद्याची आवक वाढून भावात १५० रुपयांनी वाढ झाली. येथील मार्केट यार्डमध्ये कांद्याची एकूण ८१०० क्विंटल (१६ हजार २०० गोणी) आवक झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ६८० क्विंटलने वाढूनही भावात १५० रुपयांची वाढ झाली. बटाट्याची एकूण आवक १३५० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ८५० क्विंटलने घटून भावातही १५० रुपयांची घट झाली. बटाट्याचा कमाल भाव ५०० रुपयांवरून ८०० रुपये झाला.
लसणाची एकूण आवक ५ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक व भाव स्थिर राहिले. कमाल भाव १२०० रुपये झाले.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजगुरुनगर येथील पालेभाज्यांच्या बाजारात १ लाख ९० हजार जुड्या मेथीची आवक झाली. १ लाख १५ हजार जुड्या कोथिंबिरीची आवक झाली. शेलपिंपळगाव आवारात मेथीची ४४ हजार जुड्या, तर कोथिंबिरीची २१ हजार जुड्या आणि शेपूची २ हजार ५०० जुड्यांची आवक झाली.
चाकणला हिरव्या मिरचीची एकूण आवक ४१० पोती झाली असून, मिरचीला प्रतिक्विंटल १,००० ते १५०० रुपये असा भाव मिळाला.