खून प्रकरणी तिघांच्या पोलीस कोठडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:09 AM2021-06-20T04:09:29+5:302021-06-20T04:09:29+5:30
पुणे: भाच्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी अल्पवयीन मुलास मोबाईल विक्रीच्या बहाण्याने पर्वती पायथा येथे बोलावले आणि त्याच्यावर कोयत्याने वार करून ...
पुणे: भाच्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी अल्पवयीन मुलास मोबाईल विक्रीच्या बहाण्याने पर्वती पायथा येथे बोलावले आणि त्याच्यावर कोयत्याने वार करून खून केल्याप्रकरणात दत्तवाडी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
वृषभ दत्तात्रेय रेणुसे (वय २३, रा. आंबेगाव पठार), सचिन ऊर्फ दादा प्रकाश पवार (वय १९, रा. जनता वसाहत) आणि आकाश उद्धव नवाडे (वय २१, रा. आंबेगाव पठार) असे कोठडी झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. सौरभ तानाजी वाघमारे (वय १७) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी दादासो मारुती बनसोडे (वय २३ रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. पर्वती पायथा येथे रविवारी (ता. १३) रात्री हा प्रकार घडला होता.
------------------