पालेभाज्यांच्या भावात वाढ
By Admin | Published: June 26, 2017 03:52 AM2017-06-26T03:52:03+5:302017-06-26T03:52:03+5:30
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा, भुईमूग शेंग व लसूण आवकेत घट
लोकमत न्यूज नेटवर्क
आसखेड : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा, भुईमूग शेंग व लसूण आवकेत घट झाल्याने भुईमूग शेंगा, कांद्याचे व बटाटा, भाव कमी झाले. लसणाचे भाव स्थिर राहिले. राजगुरुनगर मार्केटमध्ये या आठवड्यात पालेभाज्यांची आवक वाढली.
याही सप्तहात शेलपिंपळगाव उपबाजारात भाज्यांची आवक घटली. चाकणला पालेभाज्यांच्या बाजारात कोथिंबीर, शेपू व मेथीची आवक मंदावली.
जनावरांच्या बाजारात जर्शी गाय, बैल शेळ्या-मेंढ्या वगळता म्हशींच्या संख्येत घट झाली. जनावरांच्या बाजारात एकूण उलाढाल १ कोटी ते २५ लाख रुपये झाली.
चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक ५३० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक १४३ क्विंटलने कमी झाली भाव मात्र ७०० रुपयांवरुन ७५० रुपये झाला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक १५६० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक २५ क्विंटलने वाढली व कमाल भाव ८०० रुपयांवरून ७५०० रुपये झाला. जळगाव भुईमूग शेंगाची एकूण आवक ६० क्विंटल झाली असून,
गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ८५ क्विंटलने घटली.
शेंगांचा कमाल भावही ६ हजार ५०० रुपयांवरून ६२०० रुपये झाला, या सप्ताहातही बंदूक भुईमूग शेंगांचीआवक झाली नाही.
लसणाची एकूण आवक ८ क्विंटल झाली असून, गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ९ क्विंटलने घटली. कमाल भावही ५००० रुपयांवर
स्थिर झाले.
हिरव्या मिरचीची एकूण आवक ३२८ क्विंटल झाली. भावातही वाढ झाली. हिरव्या मिरचीला ४००० ते ६००० रुपये असा कमाल भाव मिळाला.