दोडका, गवार, मटार,फ्लॉवर, काकडीच्या दरात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:09 AM2021-09-13T04:09:50+5:302021-09-13T04:09:50+5:30
रविवारी मार्केट यार्डात सुमारे ७० ते ८० गाड्यांची आवक झाली़ त्यात परराज्यातून मध्यप्रदेश येथून ६ ते ७ टेम्पो गाजर, ...
रविवारी मार्केट यार्डात सुमारे ७० ते ८० गाड्यांची आवक झाली़ त्यात परराज्यातून मध्यप्रदेश येथून ६ ते ७ टेम्पो गाजर, गुजरात आणि कर्नाटकामधून ३ ते ४ टेम्पो कोबी, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून ३ ते ४ टेम्पो शेवगा, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटकातून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, मध्यप्रदेश आणि गुजरातमधून २ ते ३ टेम्पो भुईमुग शेंग, गुजरातमधून ९ ते १० ट्रक लसणाची तसेच आग्रा, इंदौर, गुजरात आणि स्थानिकमधून बटाट्याची ३५ ते ४० ट्रक इतकी आवक झाली.
बाजारात स्थानिक भागातून सातारी आले १००० ते ११०० गोणी, कोबी सुमारे ७ ते ८ टेम्पो, प्लॉवर ७ ते ८ टेम्पो, भेंडी ७ ते ८ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, सिमला मिरची ८ ते १० टेम्पो, टोमॅटो ६ ते ७ हजार पेटी, तांबडा भोपळा ७ ते ८ टेम्पो, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, पावटा ४ ते ५ टेम्पो, पुरंदर, वाई आणि साताऱ्याहून मटार १५० ते १७५ गोणी, भुईमुग शेंग १ हजार पोती, कांदा ५५ ते ६० ट्रक इतकी आवक झाली.
----------------------------------------