रस्ता खोदल्याने अपघातामध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:08 AM2021-06-01T04:08:28+5:302021-06-01T04:08:28+5:30

पुणे जिल्हा मार्ग क्र. ६५ असलेल्या मोरगाव-बारामती या रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. मात्र ठेकेदाराने काम एकीकडे तर खोदाई ...

Increase in road digging accidents | रस्ता खोदल्याने अपघातामध्ये वाढ

रस्ता खोदल्याने अपघातामध्ये वाढ

Next

पुणे जिल्हा मार्ग क्र. ६५ असलेल्या मोरगाव-बारामती या रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. मात्र ठेकेदाराने काम एकीकडे तर खोदाई दुसरीकडेच करून ठेवली आहे. खोदाई केलेल्या पवारवाडी पाटी, तरडोली राखीव वनक्षेत्रालगत परिसरात काम सुरू असल्याबाबतचा अथवा धोकादायक क्षेत्राबाबतचा कुठलाही फलक लावला नाही. डांबरी रस्त्यावर जागोजागी ओरखडे तब्बल वर्षभरापासून ओढून ठेवले असल्याने गाड्या आदळून अपघात होत आहेत. या रस्त्यावर तीव्र वळणावरही खोदाई करून सर्वत्रच अडचण निर्माण करून ठेवली आहे. या खोदाईमुळे या मार्गावर वर्षभरात अनेक गंभीर स्वरूपाचे अपघात झाले आहेत. तर काही वाटसरू व वाहनचालकांना आपला प्राणही गमवावा लागला असल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे या ठेकेदाराविरोधात प्रवासी, वाहनचालक, परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मोरगाव-बारामती या जिल्हा मार्ग क्र. ६५ वर गेल्या अनेक महिन्यांपासून उखडून ठेवण्यात आलेला डांबरी रस्ता.

३१०५२०२१-बारामती-०८

तरडोली (ता. बारामती) येथे राखीव वनक्षेत्रालगत रुंदीकरणासाठी रस्ता उकरून जैसे थे ठेवल्यामुळे झालेल्या अपघातात चारचाकी वाहनाचा झालेला चक्काचूर.

३१०५२०२१-बारामती-०९

Web Title: Increase in road digging accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.