शिवभोजनथाळी केंद्र वाढवा, लोकसंख्येच्या तुलनेत कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:09 AM2021-04-18T04:09:25+5:302021-04-18T04:09:25+5:30

कदमवाकवस्ती येथील जय भवानी बहुउद्देशीय सेवा मंडल व प्रतिक गार्डन मंगल कार्यालय, वाघोली येथील हॉटेल कांचन, पेरणे येथील संघर्ष ...

Increase Shivbhojanathali center, less than the population | शिवभोजनथाळी केंद्र वाढवा, लोकसंख्येच्या तुलनेत कमी

शिवभोजनथाळी केंद्र वाढवा, लोकसंख्येच्या तुलनेत कमी

googlenewsNext

कदमवाकवस्ती येथील जय भवानी बहुउद्देशीय सेवा मंडल व प्रतिक गार्डन मंगल कार्यालय, वाघोली येथील हॉटेल कांचन, पेरणे येथील संघर्ष महिला बचत गट, उरुळी देवाची येथील स्वामी समर्थ मंदिर ट्रस्ट, फुरसुंगी येथील व्यंकटेश्वरा मेस सर्व्हिसेस, जांभुळवाडी येथील स्वरांगी महिला बचत गट व पिसोळी येथील कुष्ठरोग शिवभोजन केंद्र अशी हवेली तालुका पुरवठा विभागात मान्यताप्राप्त फक्त आठ शिवभोजन थाळी केंद्र असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही थाळी पार्सलच्या माध्यमाधून उपलब्ध होईल. या थाळीमध्ये दोन चपाती, भाजी, एक वाटी डाळ आणि भात यांचा समावेश असेल. दरम्यान, ही घोषणा जाहीर झाल्यापासून लोक ९६४ शिव भोजन थाळी देणाऱ्या केंद्राची यादीची मागणी करत आहेत. दरम्यान, नागरिकांच्या मागणीनुसार, हवेलीतील पुरवठा विभागाने शिवभोजन थाळी देणाऱ्या आठ केंद्रांची यादी दिली आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी कोरोना काळात शिवभोजन थाळीमुळे लाखो स्थलांतरित नागरिकांना आधार मिळाला होता.

Web Title: Increase Shivbhojanathali center, less than the population

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.