खेड तालुक्यात चोऱ्यांमध्ये वाढ
By admin | Published: May 9, 2017 03:26 AM2017-05-09T03:26:04+5:302017-05-09T03:26:04+5:30
खेड तालुक्यात वाढत्या चोऱ्या, घरफोड्यांचे दिवसेंदिवस प्रमाण वाढले आहे. याबाबत नागरिकांनी सर्तक राहावे, असे आवाहन खेड
लोकमत न्यूज नेटवर्क
दावडी : खेड तालुक्यात वाढत्या चोऱ्या, घरफोड्यांचे दिवसेंदिवस प्रमाण वाढले आहे. याबाबत नागरिकांनी सर्तक राहावे, असे आवाहन खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांनी नागरिकांना केले आहे.
सध्या उन्हाळी सुट्या लागल्या आहेत. अनेक कुटुंबे गावाकडे, तसेच पर्यटन म्हणून थंड हवेच्या ठिकाणी जात आहे. याचाच फायदा घेऊन चोरटे बंद घराचे, फ्लॅटचे कुलूप, कडीकोयंडे तोडून घरात प्रवेश करून कपाटातील सोन्याचे दागिने लांबवित असल्याचे चित्र दिसत आहे. याबाबत खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांनी चोरी घरफोडी टाळण्याकरिता काय खबरदारी घ्यावी, याबाबत नागरिकांना अवाहन केले आहे. एप्रिल-मे-जून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बेरोजगारीमुळे चोऱ्यामध्ये वाढ होते. शक्य असेल तर सायरन, उउळश् लावावा, ऊश्फ/ठश्फ सुरक्षित जागेत लपवून ठेवावा.
कधी कधी चोरटे डीव्हीआर घेऊन जातात. आवशक्यतेपेक्षा जास्त सोने, नाणे, दागिने सुरक्षित बँकेत लॉकरमध्ये ठेवावे. बाहेरगावी जाताना सोन्याचे दागिने विश्वासू शेजारी किंवा नातेवाईक यांच्याकडे ठेवावे रोकडऐवजी वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक व्यवहार पद्धतीचा अवलंब करावा.
बाहेरगावी जाताना घरामध्ये दागिने ठेवू नये. लग्न समारंभा सारख्या कार्यक्रमास जाताना दागिन्यांचे जाहीर प्रदर्शन करून नये, तुमचे दागिने हिसका मारून पळवून नेले जाऊ शकतात.