खेड-शिवापूरच्या टोलदरात वाढ

By admin | Published: April 1, 2017 12:14 AM2017-04-01T00:14:35+5:302017-04-01T00:14:35+5:30

पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावरील (पथकर) टोलदरात याही वर्षी वाहनानुसार ५ ते २५ रुपयांची

Increase in tolls of Khed and Shivapur | खेड-शिवापूरच्या टोलदरात वाढ

खेड-शिवापूरच्या टोलदरात वाढ

Next

नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावरील (पथकर) टोलदरात याही वर्षी वाहनानुसार ५ ते २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ १ एप्रिलला मध्यरात्री १२ पासून लागू होईल.
याबाबत टोल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही दरवाढ २०१७-१८ या वर्षासाठी असेल. कार, जीप आणि इतर हलक्या वाहनांच्या दरात ५ रुपये वाढ करण्यात आली असून, त्या वाहनांसाठी आता ८५ रुपये द्यावे लागतील. लहान बस आणि व्यापारी तत्त्वासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांच्या टोल दरातही ५ रुपयांची वाढ करण्यात आली असून त्यासाठी आता १४० रुपये टोल आकारण्यात येईल. ट्रक आणि बस यांच्या टोल दरात १० रुपयांची वाढ झाली असून, त्यासाठी २९० रुपये द्यावे लागतील. जड वाहनांच्या टोलमध्ये २० रुपयांची वाढ झाली असून, त्यासाठी ४५५ रुपये टोल आकारण्यात येईल. तर, प्रमाणापेक्षा अधिक जड वाहनांच्या टोल दरात २५ रुपयांची वाढ केली असून, त्यासाठी नवीन टोल दर ५५५ रुपये इतका असेल.(वार्ताहर)

टोल दर १ एप्रिलपासून
खेड-शिवापूर टोल नाक्याच्या २० किलोमीटर परिघातील स्थानिक वाहनांना मासिक पासच्या दरात १० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
नवीन दरानुसार स्थानिक मासिक पाससाठी २४५ रुपये आकारण्यात येतील.
हे नवीन टोल दर १ एप्रिलच्या मध्यरात्री १२ पासून लागू होणार असल्याचे टोल प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

Web Title: Increase in tolls of Khed and Shivapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.