पुणे स्थानकावरून धावणाऱ्या गाड्यांच्या सेवेत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:10 AM2021-05-29T04:10:13+5:302021-05-29T04:10:13+5:30
पुणे : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सेवेसाठी पुणे रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या गाड्यांच्या सेवेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यात गोरखपूर, ...
पुणे : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सेवेसाठी पुणे रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या गाड्यांच्या सेवेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यात गोरखपूर, दानापूर, दरभंगा तसेच भागलपूरला जाणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे.
गाडी क्रमांक (०१३२९) पुणे-गोरखपूर एक्स्प्रेस ही १५ जूनपर्यंत तर गाडी क्रमांक (०१३३०) गोरखपूर-पुणे एक्स्प्रेस ही १७ जूनपर्यंत धावणार आहे.
गाडी क्रमांक (०१३३१) पुणे-दानापूर एक्स्प्रेस ही १४ जूनपर्यंत तर गाडी क्रमांक (०१३३२) दानापूर- पुणे एक्स्प्रेस ही १५ जूनपर्यंत धावणार आहे.
गाडी क्रमांक (०१३३३) पुणे-दरभंगा एक्स्प्रेस ही १० जूनपर्यंत तर गाडी क्रमांक (०१३३४) दरभंगा-पुणे एक्स्प्रेस ही १२ जूनपर्यंत धावणार आहे.
गाडी क्रमांक (०१३३५) पुणे-भागलपूर एक्स्प्रेस ही १३ जूनपर्यंत तर गाडी क्रमांक (०१३३६) भागलपूर-पुणे एक्स्प्रेस ही १५ जूनपर्यंत धावणार आहे.