खेड बाजार समितीच्या उलाढालीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:07 AM2020-12-07T04:07:40+5:302020-12-07T04:07:40+5:30

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढल्याने भावात घसरण झाली.तळेगाव ...

Increase in turnover of Khed Market Committee | खेड बाजार समितीच्या उलाढालीत वाढ

खेड बाजार समितीच्या उलाढालीत वाढ

Next

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढल्याने भावात घसरण झाली.तळेगाव बटाट्याची आवक वाढूनही बाजारभावात वाढ झाली.भुईमूग शेंगांची आवक कमी झाल्याने भावात वाढ झाली,लसूणाची आवक व भावाही वाढ झाली. टोमॅटो, वांगी, भेंडी, कारली, काकडी, दुधी भोपळा, कोबी, फ्लॉवर, भेंडी व दोडक्याच्या आवक घटूनही बाजार भावात घसरण झाली.पालेभाज्यांच्या बाजारात मेथी,कोथिंबीर,शेपू भाजीची प्रचंड आवक वाढल्याने भाव कोसळले.पालेभाज्यांची आवक वाढल्याने ग्राहक मिळत नसल्याने शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. जनावरांच्या बाजारात जर्शी गाय,म्हैस,बैल व शेळ्यांमेंढयांच्या संख्येत वाढ झाली.एकूण उलाढाल ३ कोटी ३० लाख रुपये झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ९०५ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ३४५ क्विंटलने वाढल्याने कांद्याचे भावात पुन्हा एकदा मोठी घसरण झाली. कांद्याच्या भावात तब्बल ४०० रुपयांची घसरण झाली. कांद्याचा कमाल भाव ३,९०० रुपयांवरून ३,५०० हजार रुपयांवर आला.तळेगाव बटाट्याची एकूण आवक १५२५ क्विंटल झाली.गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ९०० क्विंटलने वाढूनही बटाट्याच्या भावात १०० रुपयांची वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव ३,५०० रुपयांवरून ३,६०० हजार रुपयांवर पोहचला.लसणाची एकूण आवक १४ क्विंटल झाली.मागील आठवड्याच्या तुनलेत २ क्विंटलने कमी वाढल्याने बाजारभावात ५०० रुपयांची घट झाली.भुईमुग शेंगांची ४ क्विंटल आवक झाली.

चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक १०९ क्विंटल झाली.हिरव्या मिरचीला २,००० ते ३,५०० रुपये असा भाव मिळाला.

शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढील प्रमाणे –

कांदा - एकूण आवक - ९०५ क्विंटल. भाव क्रमांक १. ३,५०० रुपये, भाव क्रमांक २. २,७०० रुपये, भाव क्रमांक ३. २,००० रुपये.

बटाटा - एकूण आवक - १५२५ क्विंटल. भाव क्रमांक १. ३,६०० रुपये, भाव क्रमांक २. ३,२०० रुपये, भाव क्रमांक ३. ३,००० रुपये.

फळभाज्या

चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती दहा किलोंसाठी डागांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे -

टोमॅटो - ४९ पेट्या ( १,००० ते २,००० रू. ), कोबी - ९७ पोती ( ५,०० ते ९०० रू. ), फ्लॉवर - १४२ पोती ( ३०० ते ६०० रु.),वांगी - २१ पोती ( १,००० ते २,००० रु.). भेंडी - १९ पोती ( १,५०० ते २,५०० रु.),दोडका - १९ पोती ( १,००० ते २,००० रु.). कारली - २२ डाग ( १,५०० ते २,५०० रु.). दुधीभोपळा - १४ पोती ( ४०० ते ८०० रु.),काकडी - ३९ पोती ( ३०० ते ६०० रु.). फरशी - ७ पोती ( १,५०० ते २,५०० रु.). वालवड - १८ पोती ( २,००० ते ३,००० रु.). गवार - ९ पोती ( २,००० ते ३,००० रू.), ढोबळी मिरची - १७ डाग ( १,००० ते १,८०० रु.). चवळी - ५ पोती ( १,०००) ते २,००० रुपये ), वाटाणा - १७२ पोती ( ३,००० ते ५,००० रुपये ), शेवगा - ३ पोती ( ५,००० ते ७,००० रुपये ), गाजर - ३० पोती ( १,५०० ते २,५०० रु.).

पालेभाज्या

राजगुरूनगर येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात मेथीची १ लाख २५ हजार जुड्यांची आवक होऊन मेथीला १०१ ते ५०१ रुपये प्रतीशेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीरीची १ लाख ६० हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा जुड्यांना १०१ ते ४०१ रुपये एवढा भाव मिळाला. शेपूची एकूण आवक ७५ हजार जुड्या झाली असून, या जुड्यांना १५० ते ६०१ रुपये असा भाव मिळाला.

शेलपिंपळगाव येथील उपबाजारात मेथीची १ हजार ५०० जुड्यांची आवक होऊन मेथीला ३०१ ते ७०१ रुपये प्रतीशेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीरीची २ हजार २०० जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा जुड्यांना २०० ते ४०० रुपये एवढा भाव मिळाला. शेपू व पालक भाजीची काहीच आवक झाली नाही.

चाकण येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे -

मेथी - एकूण ४५ हजार ६३० जुड्या ( १०० ते ३०० रुपये ), कोथिंबीर - एकूण ३४ हजार ९५० जुड्या ( २०० ते ४०० रुपये ), शेपू - एकुण ६ हजार ७२० जुड्या ( २०० ते २०० रुपये ), पालक - एकूण ४ हजार ५८० जुड्या ( २०० ते ४०० रुपये ).

जनावरे

चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ६५ जर्शी गायींपैकी ३५ गाईची विक्री झाली. ( १०,००० ते ४८,००० रुपये ), १४० बैलांपैकी ९० बैलांची विक्री झाली.( १०,००० ते ३५,००० रुपये ), १८२ म्हशींपैकी १४० म्हशींची विक्री झाली. ( १०,००० ते ६५,००० रुपये ), शेळ्या - मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ८४५० शेळ्या - मेंढ्यापैकी ८१३० मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना १,५०० ते १२,००० रुपये इतका भाव मिळाला.

फोटो

०६ चाकण बाजार

चाकण बाजारात ढोबळी मिरचीचा लिलाव सुरू.

Web Title: Increase in turnover of Khed Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.