चासकमान धरणाच्या पाणी पातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:15 AM2021-09-12T04:15:11+5:302021-09-12T04:15:11+5:30

राजगुरूनगर : चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. शनिवारी (दि ११) ...

Increase in water level of Chaskaman Dam | चासकमान धरणाच्या पाणी पातळीत वाढ

चासकमान धरणाच्या पाणी पातळीत वाढ

Next

राजगुरूनगर : चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. शनिवारी (दि ११) दुपारी चासकमान धरणाच्या सांडव्यावरून २१३० क्युसेक्स वेगाने भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे.

४ ऑगस्ट रोजी चासकमान धरण १०० टक्के भरले होते. गेल्या दोन दिवसापासून चासकमानधरण क्षेत्रात पाऊस पडत असल्याने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून भीमा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. धरणाच्या सांडव्याद्वारे १८५० क्युसेक्स, विद्युत गृहातून ८५० क्यूसेक्स विर्सग सुरू असून त्यापैकी ५७० क्युसेक्स कालव्यातून चालू आहे. २८० क्युसेक कि. मी. ०/८१० मधील अतिवाहकातून नदीत पाणी सोडण्यात आले आहे. भीमा नदीत एकूण २१३० क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी-जास्त करण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सर्वांनी सर्तक राहण्याचे आवाहन चासकमान पाटबंधारे विभागाने केले आहे.

फोटो

Web Title: Increase in water level of Chaskaman Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.