संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा
By admin | Published: July 17, 2017 04:28 AM2017-07-17T04:28:36+5:302017-07-17T04:28:36+5:30
‘संशोधन क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अतिशय कमी आहे. यामुळे आता होणारे संशोधन हे शास्त्रीयदृष्ट्या योग्य असले,
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘संशोधन क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अतिशय कमी आहे. यामुळे आता होणारे संशोधन हे शास्त्रीयदृष्ट्या योग्य असले, तरी ते एकांगी पद्धतीचे आहे. विविध प्रकारच्या संशोधनांमध्ये महिलांचा सहभाग वाढला तर संशोधनाचे स्वरूप बदलेल’, असे मत जीवशास्त्र विषयातील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चच्या (आयसर) शास्त्रज्ञ डॉ. विनिता बाळ यांनी व्यक्त केले.
मराठी विज्ञान परिषद, आयसर आणि गरवारे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वैज्ञानिक गप्पा कार्यक्रमात डॉ. बाळ ‘जीवशास्त्र : एक बायकी दृष्टिकोन’ या विषयावर बोलत होत्या. याप्रसंगी आयसरच्या डॉ. अपूर्वा बर्वे, मराठी विज्ञान परिषदेचे कार्याध्यक्ष यशवंत घारपुरे, सचिव नीता शहा, सहसचिव संजय मालती कमलाकर, विनय र. र., डॉ. विद्याधर बोरकर आदी उपस्थित होते.
प्रा. यशवंत घारपुरे म्हणाले, ‘समाजामध्ये विज्ञान रुजवण्यासाठी मराठी विज्ञान परिषद सातत्याने विज्ञानविषयक व्याख्याने, उपक्रम आयोजित करीत असते. मराठी भाषा आणि विज्ञान याचा मेळ घालून दोन्ही गोष्टी समृद्ध करण्याचे कार्य केले जात आहे.’
डॉ. अपूर्वा बर्वे यांनी सूत्रसंचालन केले, शहा यांनी आभार मानले.