वधूपित्याची वाढली धडधड
By Admin | Published: February 1, 2015 01:11 AM2015-02-01T01:11:21+5:302015-02-01T01:11:21+5:30
महिनाभरातच सोन्याच्या दरामध्ये मोठी दरवाढ झाली आहे. त्यामुळे मुलींच्या लग्नात सोने खरेदी करण्यासाठी वाढीव खर्चाच्या विचाराने वधूकडील मंडळी काळजीत पडली आहेत.
अंकुश जगताप ल्ल पिंपरी
महिनाभरातच सोन्याच्या दरामध्ये मोठी दरवाढ झाली आहे. त्यामुळे मुलींच्या लग्नात सोने खरेदी करण्यासाठी वाढीव खर्चाच्या विचाराने वधूकडील मंडळी काळजीत पडली आहेत. दरवाढीमुळे सरासरी ८ टक्के जादा खर्च सोसण्याची वेळ आली आहे. वधूपित्यास तसेच वराकडील मंडळींनाही जादा खर्चाची तरतुदीसाठी धडपड करावी लागते.
सोने, चांदी खरेदीसाठी ग्राहकांचा ओघ वाढत आहे. प्रतितोळ्यासाठी घडणावळीच्या रुपाने सराफांकडून अडिच ते ३ हजार रुपयांपर्यंत खर्च आकारला जात आहे. त्यामुळे वधुसाठी किमान एक तोळ्याचा दागिना करण्यासाठी ३० हजार रुपयांपर्यंत जादाचा खर्च करावा लागत आहे. काही सधन कुटुंबातील वधू, वरासाठी दागिने जावयी सन्मान, मध्यस्तींचा सत्कार, पाहुण्यांकडून दागिन्यांच्या रुपाने सन्मान दिला जातो.
४मागील महिन्यात २४ कॅरेट सोन्याचा दर २५ हजार रुपयांपर्यंत होता. मात्र मागील पंधरा दिवसांपासून पुन्हा सोन्याचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे.
४२ जानेवारी रोजी २४ कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमसाठीचा दर २७ हजार २५ रुपये होता. ५ तारखेला त्यामध्ये ३०० रुपयांनी वाढ होत तो २७ हजार ५०० रुपयांवर पहोचला. याचवेळी चांदीचा प्रतिकिलोचा दर ५१५ रुपयांनी वाढत ३६ हजार ७५० रुपयांवर पोहोचला. २० जानेवारीला सोन्याचा भाव २८ हजार १८० रुपयांवर पोहोचला. चांदी आणखी महाग होत ३९ हजार २०० रुपयांवर पोहोचली. २८ जानेवारीला सोन्याने २८ हजार ४४० रुपयांचा पल्ला गाठला तर चांदी ३९ हजार २१२ रुपयांवर पोहोचली. ३१ तारखेला सोने २८ हजार ५०० रुपये तोळा झाले. चांदीचा दर ३७ हजार ७२० रुपयांवर स्थिरावला.
वधूपित्याचा भार हलका
४परिसरात उपवर मुलींचे प्रमाण खुपच कमी आहे. अशात आपल्या लाडक्या मुलास साजेल, शोभेल अशी वधू शोधण्यासाठी त्यांच्या पालकांची धावाधाव सुरू आहे. मुलगी पसंत होते, बहुदा ती नात्यातीलच असते. मात्र तिच्या कुटूंबियांची आर्थिक स्थिती नाजूक असल्यास अशा वेळी लग्नाची बोलणी करताना हुंड्याच्या रुपाने तोळ्यांची अपेक्षा न ठेवता आम्हीच मुलीला दागीने करतो, अशी तयारी वराकडील काही मंडळी दर्शवित आहेत. त्यामुळे वधुपित्याचा दागिन्यावरील खर्चाच्या रुपाने लग्नकार्यातील भार हलका होत आहे.
अनेकांचे पूर्वनियोजन आले कामी
४दिवाळीनंतर सोन्याचे दर आवाक्यात आले होते. त्याचा फायदा घेत अनेक कुटुंबीयांनी आपल्या विवाहेच्छूक मुलांसाठी सोने, चांदीचे दागीने आगाऊच खरेदी करुन ठेवले आहेत. यावेळी २६ हजारांच्या आसपास दर राहिल्याने सध्याची दरवाढ पाहता त्यांची ८ टक्केंपर्यंत पैशांची बचत झाली असून पुर्वनियोजन कामी आले आहे.