शहर, जिल्ह्यात आमदारकीसाठी महिलांकडून वाढली दावेदारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 01:45 PM2019-09-25T13:45:43+5:302019-09-25T13:52:20+5:30

सध्या संपूर्ण जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत.

Increased demand for women in MLA' s seats in city and district | शहर, जिल्ह्यात आमदारकीसाठी महिलांकडून वाढली दावेदारी 

शहर, जिल्ह्यात आमदारकीसाठी महिलांकडून वाढली दावेदारी 

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यातील २१ पैकी ९ मतदारसंघांवर महिलांचा दावामागील वेळी राज्यात २० जणी विधानसभेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांच्या ५० टक्के आरक्षणाचे सकारात्मक परिणाम किती महिलांना पक्षांकडून तिकीट मिळणार व किती आमदार होणार, लवकरच होईल स्पष्ट

सुषमा नेहरकर-शिंदे- 
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांच्या ५० टक्के आरक्षणाचे सकारात्मक परिणाम दिसून लागले आहेत. यंदा प्रथमच विधानसभा निवडणुकीसाठी २१ पैकी ९ मतदारसंघांमध्ये  महिलांनी आमदारकीसाठी दावा केला. यामध्ये सर्वपक्षीय महिला इच्छुकांचा समावेश असून,  येत्या काही दिवसांत शहर आणि जिल्ह्यात नक्की किती महिलांना उमेदवारी मिळते ते स्पष्ट होईल.
सध्या संपूर्ण जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. युती-आघाडीच्या चर्चा सुरू असून, येत्या काही दिवसांत बहुतेक सर्व पक्षांचे उमेदवार निश्चित होतील. यामुळे मतदारसंघ आपल्या पक्षाच्या पदरात पडावा, उमेदवारी आपल्याच मिळावी, यासाठी मोठ्या प्रमाणात मोर्चेबांधणी सुरू आहे. यामध्ये महिला इच्छुकदेखील आघाडीवर आहेत; परंतु यंदा प्रथमच अनेक इच्छुक महिला उमेदवारांनी पुढे येऊन मतदारसंघावर आपला दावा सांगितला आहे. यामध्ये जिल्ह्यात जुन्नर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेतून निलंबित करण्यात आलेल्या आशा बुचेक तीव्र इच्छुक असून, २०१४च्या निवडणुकीत थोड्या मतांनी त्यांची आमदारकी हुकली. या वेळी अपक्ष किंवा मनसेकडून त्या निवडणूक लढवू शकतात. तर, मावळ विधानसभा मतदारसंघात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे यांनी राष्ट्रवादी काँगे्रसमधून आमदारकीवर दावा सांगितला आहे. दौंड तालुक्यात ‘महानंद’च्या माजी अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी राष्ट्रवादी काँगे्रसकडून उमेदवारी मागितली आहे. शहरामध्ये महिला आमदारकीसाठी पुढे आल्या आहेत. यामध्ये पिंपरीमध्ये आरपीआयच्या चंद्रकांत सोनकांबळे इच्छुक आहेत. सन २०१४च्या निवडणुकीत केवळ दोन ते अडीच हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. तसेच, पिंपरी मतदारसंघात भाजपच्या तेजस्विनी कदमदेखील इच्छुक आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या सुलभा उबाळे इच्छुक असून, यापूर्वीदेखील त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आहे. कसबा मतदारसंघात आमदारकीसाठी  विद्यमान महापौर मुक्ता टिळक यांचा दावा  आहे. येथे काँगे्रसच्या माजी आमदार कमल ढोले-पाटील इच्छुक आहेत. पर्वती मतदारसंघात विद्यामान आमदार माधुरी मिसाळ पुन्हा इच्छुक असून, राष्ट्रवादी काँगे्रसकडून माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम यांनी उमेदवारी मागितली आहे. तर, कोथरूडमध्ये विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांनी पुन्हा मतदारसंघावर दावा सांगितला आहे.
.........
* शहर आणि जिल्ह्यातील आतापर्यंत झालेल्या महिला आमदार मालाबाई शिरोळे-बारामती, लीलाताई मर्चंट-कसबा, लताबाई तांबे-जुन्नर, रूपलेखा ढोरे-मावळ, कमल ढोले-पाटील-भवानी पेठ, माधुरी मिसाळ-पर्वती, मेधा कुलकर्णी-कोथरुड.

शहर आणि जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांपैकी ९ मतदारसंघांमध्ये विविध पक्षांकडून १३ महिला उमेदवारांनी आमदारकीसाठी दावा सांगितला आहे. यांपैकी अनेक मतदारसंघांत महिलांना आपल्या पक्षातील पुरुष सहकाऱ्यांशी स्पर्धा करावी लागत आहे. त्यामुळे यापैकी किती महिलांना पक्षांकडून तिकीट मिळणार व किती आमदार होणार, हे लवकरच स्पष्ट होईल.

Web Title: Increased demand for women in MLA' s seats in city and district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.