पीएमपीच्या उत्पन्नात वाढ, कामकाजात सुधारणेमुळे वाढली प्रवाशांची संख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 12:57 AM2017-11-25T00:57:18+5:302017-11-25T00:57:37+5:30
पुणे : शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेलल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) कामकाजात मागील काही महिन्यांपासून अनेक सुधारणा झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
पुणे : शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेलल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) कामकाजात मागील काही महिन्यांपासून अनेक सुधारणा झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. बस संचनलासह विविध कारणांमुळे पीएमपीच्या उत्पन्नात आणि प्रवाशांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत एप्रिल ते आॅक्टोबर या कालावधीत हे उत्पन्न सुमारे १२ कोटींनी वाढले असून मागील पाच वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याची माहिती पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी दिली. ‘पीएमपी’विषयी महापालिकेने बोलावलेल्या खास सर्वसाधारण सभेमध्ये मुंढे यांनी पीएमपीचा लेखाजोखा सादर केला. त्यावर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्या. मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी एप्रिल ते आॅक्टोबर या महिन्यामध्ये पीएमपीला सुमारे ३०९ कोटी ३ लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. यावर्षी याच कालावधीत मिळालेले उत्पन्न सुमारे ३२१ कोटी ५४ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या कालावधीत मिळालेल्या उत्पन्नामध्ये सुमारे १२ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या कालावधीत प्रतिदिन सरासरी १ कोटी ५० लाख रुपये उत्पन्न दिसून येते.
यावर्षी सप्टेंबर व आॅक्टोबरचे वाहतूक उत्पन्न मागील ५ वर्षांतील उत्पन्नापेक्षा जास्त आहे. आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यातील प्रतिबस उत्पन्न मागील पाच वर्षांपेक्षा जास्त आहे. सप्टेंबर २०१७ ची प्रवासी संख्याही मागील पाच वर्षांपेक्षा
जास्त आहे.
२०१६-१७ मध्ये मार्गावर
सरासरी १३८३ बस होत्या. नोव्हेंबर २०१७ मध्ये ही सरासरी १४७२ एवढी आहे. बसेसच्या संचलनामध्येही मागील ७ ते ८ महिन्यांत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. एप्रिल ते आॅक्टोबर २०१६ अखेरीस बसेसचे सरासरी संचलन सुमारे ६ कोटी ४१ लाख किलोमीटर होते. तर यावर्षी याच कालावधीत हे संचलन सुमारे ६ कोटी ७१ लाख किलोमीटरपर्यंत पोहचले आहे.
पीएमपीच्या मालकीच्या बसचे सुमारे ४० लाख ३० किलोमीटर संचलन अधिक झाले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पीएमपीच्या मालकीच्या बसचे संचलन वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. खासगी
बस ठेकेदारांच्या बसेसचे संचलन एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत मागील
वर्षीच्या तुुलनेत सुमारे ९ लाख १० हजार किलोमीटरने कमी झाले आहे. त्यामुळे अधिक संचलनामुळे ठेकेदारांना द्यावी लागणारी रक्कम कमी झाली आहे.
>मार्गांचे सुसूत्रीकरण करण्यात आले असून
३७४
मार्गांमधील अनेक तोट्याचे मार्ग बंद करून ते
२५३
पर्यंत खाली आणले आहेत. तर सुमारे
३५
नवीन मार्गही सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळेही उत्पन्नात वाढ झाली असून अतिरिक्त खर्च कमी झाला आहे.
>विविध कारणांसाठी खासगी बस ठेकेदारांना
२०१६-१७
मध्ये २१ कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला होता.
यावर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत त्यामध्ये दुपटीहून अधिक वाढ झाली असून
४८ कोटी ६१ लाख
रुपये दंड
आकारण्यात आला.
>ठळक मुद्दे
आॅक्टोबर २०१६ अखेर उत्पन्न
३०९ कोटी ३ लाख ४९ हजार ४९८
आॅक्टोबर २०१७ अखेर उत्पन्न
३२१ कोटी ५४ लाख २६ हजार ४३८
>बसचे संचलन
एप्रिल ते आॅक्टोबर २०१६ अखेर
६ कोटी ४१ लाख ५५ हजार ४८२
एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ अखेर
६ कोटी ७१ लाख ५७ हजार ६६७
प्रवासी केंद्रीत बदल
‘पीएमपी’मध्ये प्रवासी केंद्रीत बदल केले जात आहेत. अधिकाधिक बस मार्गावर आणण्यासाठी देखभाल-दुरूस्तीचे कामात महत्त्वाचे बदल करण्यात आला आहे. रात्रपाळी सुरू करण्यात आल्याने दिवसभर मार्गात अधिक बस मिळत आहेत.
ब्रेकडाऊनचे प्रमाण ३५० वरून ९० पर्यंत कमी झाले असून ते एक टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचा प्रयत्न आहे. मार्गांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. अशा विविध कारणांमुळे उत्पन्न व प्रवाशांमध्येही वाढ झाली असल्याचे मुंढे यांनी सांगितले.