इंदापूरमधील शेतक-यांचे जीवनमान उंचावले
By admin | Published: October 7, 2014 06:24 AM2014-10-07T06:24:29+5:302014-10-07T06:24:29+5:30
इंदापूर तालुक्यातील पाणी प्रश्न, ऊस गाळपाचा प्रश्न, वीज पुरवठा, खडकवासला व उजनी धरणातून पाण्याची योजना मार्गी लावल्याने शेतक-यांचे जीवनमान उंचावले आहे
लोणी देवकर : इंदापूर तालुक्यातील पाणी प्रश्न, ऊस गाळपाचा प्रश्न, वीज पुरवठा, खडकवासला व उजनी धरणातून पाण्याची योजना मार्गी लावल्याने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तालुक्याचा विकास अधिक गतिमान झाला. काँग्रेस हा सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. त्यामुळे या निवडणुकीतही जनता आमच्या पाठिशी राहील, असे काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी आशा व्यक्त केली.
लोणी देवकर (ता. इंदापूर) येथे प्रचार सभेत हर्षवर्धन पाटील बोलत होते. पाटील म्हणाले, १९९५ साली या भागात प्यायला पाणी नव्हते. आता ऊस उपलब्ध झाला. तर कोठे गाळपासाठी घालायचा हा प्रश्न निर्माण होत होता. या भागात खडकवासला व उजनी येथून पाईपलाईनमुळे ऊस भरपूर प्रमाणात निर्माण करण्यासाठी वीज व भांडवलासाठी आम्ही प्रयत्न केले. विजेसाठी उपकेंद्र आणले. सहकाराच्या माध्यमातून पीक कर्ज उपलब्ध करून दिले. तसेच मासळी बाजार डाळींबासाठी बाजार उपलब्ध करून दिले.
अॅड. विकास देवकर यांनी प्रास्ताविक केले. रामस्वरूप तोंडे यांनी आभार मानले. काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार मंगेश डोंगरे यांनी केला. डॉ. सुहास डोंगरे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी तानाजी तोंडे, अविनाश देवकर, लहूजी कानगुडे, संतोष डोंगरे, प्रदीप थोरात, कालीदास तोंडे, लालासाहेब राखुंडे, बाळासाहेब घाडगे, महेंद्र गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.