बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचा वाढला आकडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:11 AM2021-05-16T04:11:00+5:302021-05-16T04:11:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ कमी झाली असून बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. शनिवारी ...

Increased number of people recovering from injuries | बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचा वाढला आकडा

बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचा वाढला आकडा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ कमी झाली असून बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. शनिवारी दिवसभरात १ हजार ६९३ रुग्ण आढळून आले. तर, दिवसभरात ३ हजार ३३ रुग्ण बरे झाले आहेत. विविध रुग्णालयातील १,४१३ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या घटली असून हा आकडा २२ हजार ३०४ झाला आहे.

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १,४१३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ५ हजार ७२० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ४८ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ७ हजार ६५९ झाली आहे. पुण्याबाहेरील २४ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात एकूण ३ हजार ३३ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख २८ हजार २३ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ४ लाख ५७ हजार ९८६ झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या २२ हजार ३०४ झाली आहे.

-------------

दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १६ हजार ४०९ नागरिकांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २३ लाख ५२ हजार ६१९ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

----

मृत्यू दर : २.८५ टक्के

पॉझिटिव्हीटी रेट : १३.६ टक्के

रिकव्हरी रेट : २४.५ टक्के

Web Title: Increased number of people recovering from injuries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.