सोनेतस्करीतूनच वाढली संघटित गुन्हेगारी
By admin | Published: November 30, 2014 12:34 AM2014-11-30T00:34:14+5:302014-11-30T00:34:14+5:30
‘‘मेरा सोना दुबईसे आता है,’’ 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिवार’ चित्रपटातील चाळीस वर्षापूर्वीच्या सोन्याच्या तस्करीचे वास्तव चित्र मांडणारे होत़े
Next
पुणो : ‘‘मेरा सोना दुबईसे आता है,’’ 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिवार’ चित्रपटातील चाळीस वर्षापूर्वीच्या सोन्याच्या तस्करीचे वास्तव चित्र मांडणारे होत़े दुबई आणि आखाती देशातून मुंबईमध्ये होणा:या सोन्याच्या तस्करीवर आधारलेल्या कथानकांवर अनेक चित्रपट आजवर प्रदर्शित झाल़े आर्थिक उदारीकरणानंतर आयात कर कमी झाल्याने सोन्याची तस्करी बंद झाली होती; पण गेल्या चार वर्षात सोन्यावरील आयात करात वाढ होऊ लागली़ दुबई व अन्य देशातील सोन्याचे दर आणि भारतातील दर यातील फरक वाढल्याने सोन्याची ही चोरटी आयात पुन्हा वाढू लागली आह़े विशेष म्हणजे, त्यात पुन्हा संघटित गुन्हेगारी टोळ्यांचा सहभाग वाढला असून, त्याला आता आंतरराष्ट्रीय स्वरूप आले आह़े मुंबईबरोबरच पुणो, गोवा, कोलकत्ता, मंगलोर येथील विमानतळावर गेल्या काही महिन्यांमध्ये तस्करी करून आलेले सोने जप्त करण्याचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत़
भारतात इन्स्पेक्टर राज असताना परकीय चलनाची चणचण असल्याने आयातीवर अधिक कर होता़ त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंबरोबर सोन्याची चोरटी आयात मोठय़ा प्रमाणावर होत होती़ सोन्याच्या तस्करीला ख:या अर्थाने सुरुवात केली, ती हाजी मस्तान आणि युसूफ पठाण यांनी. त्यांच्यानंतर अस्लम पटणी व त्यानंतर दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांनी या तस्करीची सर्व सूत्रे आपल्याकडे घेतली़ मोठी ऑर्डर असेल, तर बोटीतून चोरटी आयात केली जात असे; पण त्याला खूप वेळ आणि धोकाही अधिक असल्याने, त्याऐवजी विमानमार्गे तस्करी अधिक होऊ लागली़ 198क् ते 199क् च्या दशकात विमानमार्गे अधिक तस्करी होऊ लागली़ त्यात अनेक वेगवेगळे प्रकार असत़
तेव्हा माजिर्नही खूप असत़ बंदर अथवा विमानमार्गे आलेला माल हा प्रामुख्याने या टोळ्यांचे वर्चस्व असलेल्या पायधुनी, डोंगरी या भागात येत व तेथून तो ज्याची मागणी असेल, त्याच्याकडे पाठविला जात अस़े अनेकदा तो मोटारसायकलवरून पाठविला जात़ (प्रतिनिधी)
ऑन पर्सनमार्फत तस्करी
1 दुबई, अॅमस्टरडॅमहून येणारी विमाने मुंबईमार्गे बँकॉक, हॉंगकाँगला जात असतात़ या विमानातून येणा:या प्रवाशांना मधल्या वेळेत विमानतळाच्या बाहेर जाता येत नाही़ त्यांना मधल्या ट्रॉन्ङिाट एरियात थांबावे लागत अस़े या वेळी दुबई व इतरत्र ठिकाणाहून सोने घेऊन येणारा प्रामुख्याने ज्ॉकेट घालून येत अस़े त्या ज्ॉकेटला चोरकप्पे असत़ त्यात सोन्याची बिस्किटे, चीप्स लपवून ठेवत़
2 ट्रॉन्ङिाट एरियामध्ये हा प्रवासी आल्यावर सांकेतिक खुणोची ओळख पटली, की तो हा माल तेथील सफाई कामगार, अनेकदा एअरलाईन्स कर्मचारी, पोलीस यांच्याकडे देत़ काही वेळा तो हे पॅकेट डस्टबिनमध्ये टाकत अस़े विमानतळावरील कचरा एका विशिष्ट ठिकाणीच नेला जात अस़े त्या ठिकाणी ते पॅकेट काढून घेतले जात़