महिलांसाठी वाढीव राखीव डबा
By admin | Published: September 16, 2014 11:05 PM2014-09-16T23:05:30+5:302014-09-16T23:05:30+5:30
दौंड-पुणो शटलला महिलांसाठी वाढीव अन्य एक डबा जोडण्यात आला आहे. त्यामुळे महिला प्रवासीवर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.
Next
दौंड : दौंड-पुणो शटलला महिलांसाठी वाढीव अन्य एक डबा जोडण्यात आला आहे. त्यामुळे महिला प्रवासीवर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. यासाठी दौंड-पुणो प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता, अशी माहिती विकास देशपांडे यांनी दिली.
दौंड-पुणो शटलला महिलांची वाढती संख्या लक्षात घेता या गाडीला असलेला एक डबा महिलांसाठी गैरसोयीचा होता. दौंड सोडल्यानंतर या डब्यात पुरुषमंडळी देखील प्रवास करीत असत.
पुरुषांना महिलांनी हटकले असता ते अरेरावीची भाषा करून हैदोस घालत असत, असे प्रकार वारंवार
घडत होते. त्यामुळे महिलांना
याचा उपद्रव वाढला होता. तसेच पाटस, केडगाव, यवत, उरुळी
कांचन, लोणी, मांजरी, हडपसर येथील महिलांना उभे राहून ताटकळत
प्रवास करावा लागत होता.
तेव्हा महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महिलांसाठी अन्य एक डबा जोडण्यात यावा, अशी मागणी दौंड-पुणो प्रवासी संघटनेच्या वतीने रेल्वे प्रशासनाकडे केली होती.
वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर रेल्वे प्रशासनाने दखल घेऊन महिलांसाठी अन्य डबा सुरू केल्याने महिला प्रवासीवर्गात समाधानाचे वातावरण निर्माण
झाले आहे.
याकामी दौंड रेल्वे स्टेशन प्रबंधक आर. बी. सिंह, मुख्य तिकीट पर्यवेक्षक घुमरे, सोलापूर विभागीय रेल्वे अधिकारी नर्मदेश्वर झा यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. (वार्ताहर)
महिलांनी अन्य डब्यात बसू नये
4महिला प्रवाशांनी अन्य डब्यामध्ये न बसता महिलांसाठी आरक्षित असलेल्या डब्यामधूनच प्रवास करावा, की जेणोकरून महिलांना उपद्रव होणार नाही. तसेच भविष्यात या रेल्वे डब्यात महिला पोलीसदेखील कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे दौंड रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वसंतराव शेटे यांनी सांगितले.