२२५ रुपयांनी वाढविले, अन् केवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:10 AM2021-04-04T04:10:12+5:302021-04-04T04:10:12+5:30

सिलिंडर स्वस्ताई नावालाच पुणे : वाढत्या महागाईचा सामना करताना जीव मेटाकुटीस आला आहे. सततच्या गॅसच्या दरवाढीने गृहिणी त्रासल्या आहेत. ...

Increased by Rs. 225 only | २२५ रुपयांनी वाढविले, अन् केवळ

२२५ रुपयांनी वाढविले, अन् केवळ

googlenewsNext

सिलिंडर स्वस्ताई नावालाच

पुणे : वाढत्या महागाईचा सामना करताना जीव मेटाकुटीस आला आहे. सततच्या गॅसच्या दरवाढीने गृहिणी त्रासल्या आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून गॅसचे २२५ रुपयापर्यंत दर वाढविले. नव्या आर्थिक वर्षात दर कमी होतील असे वाटत असताना १ एप्रिलपासून गॅसचे दर तब्ब्ल १० रुपयांनी स्वस्त करून नागरिकांची थट्टा केली आहे. सरकारने नावालाच स्वस्ताई करून तोंडाला पाने पुसण्याचे प्रकार केला आहे, असा संताप गृहिणींनी व्यक्त केला.

अपुऱ्या उत्पन्नामुळे घराचा आर्थिक गाडा ओढताना दमछाक होत आहे. महागाई वाढत असल्याने आर्थिक गणित जुळवणे अवघड होत चालले आहे. त्यात सरकारने सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ केली आहे. पेट्रोलच्या दरांनी शंभरी गाठली आहे. कोणत्याच बाजूने हे सरकार जगू देत नाही. सर्वसामान्य कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहेत. कोरोनाने जगणे अवघड केले आहे. हाताला कामे देखील राहिले नाहीत. पगार, मजुरी देखील कमी झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असतील तर जगायचे कसे, असा मोठा प्रश्न समोर उभा राहिला आहे. या सरकारला किमान गरिबांसाठी काय करता येत नसेल तर किमान महागाई तर वाढवू नये. अशा विविध तक्रारींचा पाढा महिलांनी ‘लोकमत’कडे मांडला.

कोट

महागाई नियंत्रण नेमके कोणाच्या हातात आहे. सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. खाजगीकरणाचा घाट घातला जात आहे. त्यामुळेच महागाई वाढत आहे. आर्थिक उत्पन्न कमी झाले आहे. गॅस चे दर वाढत आहेत. कसे घर चालवणे हे समजत नाही.

- विशाखा इंगळे, गृहिणी.

कोरोनामुळे आर्थिक उत्पन्न घटले आहे. रोजगार राहिला नाही. मिळेल ते काम करून जगतो आहोत. महिन्याला जर हजार रुपये गॅसलाच गेले तर कसे घर चालणार. इतर ही खर्च आहे. १० रुपये कमी करून काय मोठा स्वस्ताईचा डोंगर फोडला आहे.

- सोनाली भोंडे, गृहिणी.

गॅस वापरणे अवघड होत चालले आहे. सरकारी दुकानात रॉकेल मिळणे कठीण आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था वापरता येत नाही. चुलीवर स्वयंपाक करणे हाच उपाय आहे. विजेवर चालणारी शेगडी परवड नाही. गॅस, पेट्रोल आणि वीज यांच्या बिलांची नकोसे केले आहे. सबसिडी कुठे आहे, सापडली तर सांगा.

- अर्चना गायकवाड, गृहिणी.

ग्राफ रुपये

नोव्हेंबर २०२० - ५९७

डिसेंबर २०२० - ६४७

जानेवारी २०२१- ६९७

फेब्रुवारी २०२१ - ७७२

मार्च २०२१ - ८२२

एप्रिल २०२१- ८१२

-----------------

मागील महिन्यांचा आढावा घेतला तर नोव्हेंबर २०२० - ५९७ , डिसेंबर २०२० - ६४७, जानेवारी २०२१- ६९७ , फेब्रुवारी २०२१ - ७७२ , मार्च २०२१ - ८२२ , एप्रिल २०२१- ८१२ सातत्याने गॅसच्या दरात वाढ होत आहे. १ एप्रिल पासून गॅस सिलिंडर आता ८१२ रुपयांना मिळणार आहे. मार्च मध्ये ८२२ रुपयांना गॅस सिलिंडर मिळत होता तर आता एप्रिल महिन्यात ८१२ रुपयांना गॅस मिळणार आहे. या आकडेवारीवरून सरकारने केवळ १० रुपयांनी गॅस स्वस्त केला असल्याचे स्पष्ट होत आहे.

Web Title: Increased by Rs. 225 only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.