पुणे विमानतळावरील सुरक्षाव्यवस्था वाढवली : प्रवाशांना तीन तास आधी पोहचण्याचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 09:33 PM2019-08-10T21:33:13+5:302019-08-10T21:36:04+5:30

जम्मु व काश्मीरमधील सद्यस्थिती तसेच स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभुमीवर पुणे विमानतळावरील सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे. विमानतळावर ये-जा करणारे सर्व प्रवासी व कर्मचाऱ्यांचीही ही कसून तपासणी केली जात आहे.

Increased security at Pune airport: call for passengers to arrive three hours in advance | पुणे विमानतळावरील सुरक्षाव्यवस्था वाढवली : प्रवाशांना तीन तास आधी पोहचण्याचे आवाहन 

पुणे विमानतळावरील सुरक्षाव्यवस्था वाढवली : प्रवाशांना तीन तास आधी पोहचण्याचे आवाहन 

Next

पुणे : जम्मु व काश्मीरमधील सद्यस्थिती तसेच स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभुमीवर पुणे विमानतळावरील सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे. विमानतळावर ये-जा करणारे सर्व प्रवासी व कर्मचाऱ्यांचीही ही कसून तपासणी केली जात आहे. प्रवाशांनी विमान उड्डाणापुर्वी किमान तीन तास आधी पोहचावे असे आवाहन विमानतळ प्रशासनाने केले आहे. 
ब्युरो ऑफ सिव्हील अ‍ॅव्हीएशन सिक्युरिटीने (बीसीएएस) देशभरातील सर्व विमानतळांना हाय अलर्ट दिला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभुमीवर दरवर्षी विमानतळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली जाते. मात्र, यापुर्वी जम्मु व काश्मीरमध्ये ३७० कलम रद्द करण्यात आल्याने तणावाची स्थिती आहे. त्यामुळे आणखी कडक करण्यात आलेली सुरक्षा व्यवस्था दि. ३१ ऑगस्टपर्यंत कायम राहणार आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला (सीआयएसएफ)कडून प्रवाशांसह विमानांची तपासणी केली जात आहे. त्यासाठी दलाच्या जवानांची संख्या वाढविण्यात आली आहे. विमानांमध्येही प्रवाशांची कसून तपासणी करण्याच्या सुचना विमान कंपन्यांना दिल्याचे दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तपासणीदरम्यान प्रवाशांना बेल्ट, घड्याळे, बुट काढण्यास सांगितले जात असल्याने तपासणीमध्ये वेळ जातो. प्रवाशांकडून त्यासाठी सहकार्य मिळत असल्याचे  सांगितले.

Web Title: Increased security at Pune airport: call for passengers to arrive three hours in advance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.