स्वमग्नता आजारात वाढ, मुलांना समजून घेण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:08 AM2021-06-18T04:08:49+5:302021-06-18T04:08:49+5:30
भारतात आॅटिझमचे प्रमाण २००० साली एक हजार मुलांमागे एक असे होते तर तेच प्रमाण वाढून २०१५ मध्ये ६८ मुलांमागे ...
भारतात आॅटिझमचे प्रमाण २००० साली एक हजार मुलांमागे एक असे होते तर तेच प्रमाण वाढून २०१५ मध्ये ६८ मुलांमागे एक आॅटिस्टिक मूल असे वाढले. यात स्त्री-पुरुष हे प्रमाण १ : ४ असे आढळते, असे प्रसन्न आॅटिझम सेंटरच्या साधना गोडबोले यांनी सांगितले.
हा दिवस का साजरा करतात?
आंतरराष्ट्रीय स्तरावर याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच पीडित व्यक्तींसाठी चांगले वातावरण, आजाराबाबत अभिमानाची भावना व त्यांना प्रगतीच्या संधी निर्माण होण्यासाठी दरवर्षी १८ जून रोजी हा दिवस साजरा करतात.
वयाच्या दुसऱ्या वर्षानंतर या आजाराचे निदान होते. आॅटिझम झालेले मूल गतिमंद नसून ती केवळ शारीरिक अक्षमता आहे. ती एक वैकासिक समस्या आहे. यातील ५० टक्के मुले बोलू शकत नसल्यामुळे कुटुंबीयांना त्यांच्या समस्या समजत नाही.
प्रसन्न आॅटिझम सेंटर ही संस्था दोन दशके याबाबत काम करत आहे. समाज या मुलांना खुल्या मनाने स्वीकारत नसल्याने याबाबत जनजागृती करत आहे. संस्थेत सध्या ४३ मुले प्रशिक्षण घेत आहेत.
--------------
आॅटिस्टिक मुलांच्या समस्या वेगळ्या असतात. त्यांना प्रशिक्षणाची गरज असते. आम्ही त्यांना विविध विकास कौशल्यांचे प्रशिक्षण देतो. कुटुंबातील सदस्यांनाही त्यांच्याशी कसे वागावे याबाबत प्रशिक्षण देतो. त्यामुळे त्यांचे जीवन सुसह्य होते.
- साधना गोडबोले, प्रसन्न आॅटिझम सेंटर, व्यवस्थापकीय संचालिका
---------------
मुलगा अडीच वर्षांचा असताना स्वमग्न असल्याचे कळले. आम्ही खचून न जाता त्याला प्रशिक्षण दिले. त्यामुळे दैनंदिन गोष्टी करताना त्याला अडचण येत नाही. त्याने चिकाटीने पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केला असून संगीत या क्षेत्रात त्याला चांगली गती असल्याचे आमच्या लक्षात आले. त्यात तो रमून गेला असून संगीतामध्ये पुढील शिक्षण घेत आहे.
- रमेश साळुंखे, आॅटिस्टिक मुलाचे पालक