प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाढली झोपडपट्टी

By admin | Published: August 9, 2016 01:32 AM2016-08-09T01:32:27+5:302016-08-09T01:32:27+5:30

महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने शहरातील झोपडपट्ट्यांमधील झोपड्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. हे वास्तव असून, दर वर्षी किमान दहा टक्के झोपड्या प्रत्येक विभागात वाढत आहेत

Increased slums due to lack of administration | प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाढली झोपडपट्टी

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाढली झोपडपट्टी

Next


भोसरी : महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने शहरातील झोपडपट्ट्यांमधील झोपड्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. हे वास्तव असून, दर वर्षी किमान दहा टक्के झोपड्या प्रत्येक विभागात वाढत आहेत. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजना कोणासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातील पहिली झोपडपट्टी हगणदरीमुक्त म्हणून चर्चेत असलेल्या या प्रभागात घाणीच्या साम्राज्यामुळे सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे. बालाजीनगर परिसरात सगळीकडे दलदल झाली असून, सगळीकडे अस्वच्छता दिसून येत
आहे.
प्रभाग क्रमांक ३७, महात्मा फुलेनगरमध्ये बालाजीनगर, लांडेवाडी व महात्मा फुलेनगर या तीन झोपडपट्ट्या येत आहेत. ९० टक्के भाग झोपडपट्ट्यांचा आहे. या ठिकाणी गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेच्या सीमा सावळे व राष्ट्रवादीचे जितेंद्र ननावरे, नगरसेवक म्हणून काम पाहत आहेत. घाणीचे साम्राज्य, अस्वच्छता, दलदल, उघड्यावरील हगणदरी ही या भागातील प्रमुख समस्या आहे. तसेच या भागात हातभट्टी खुले आम विकली जात असे. गेल्या चार-पाच वर्षांत या परिसरात दारूअड्डा पूर्णपणे बंद आहे.
या तिन्ही झोपडपट्ट्या हगणदरीमुक्त होण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रत्येक लाभार्थीला अनुदान दिले जात आहे. त्याचा फायदा या ठिकाणी चांगला झाला असल्याचे पाहावयास मिळत आहे. स्वच्छ भारत अभियानामार्फत महापालिका १८ हजार अनुदान घर टू घर शौचालयास मिळत आहेत. या परिसरात कसलाही दवाखाना नाही. बहुउद्देशीय हॉल, क्रीडांगणाची मागणी खूप वर्षांपासून आहे. या तिन्ही झोपडपट्ट्या एमआयडीसीमध्ये येतात.
पिण्याचे पाणी एमआयडीसीकडून येते. या भागात गार्डन, स्मशानभूमीचे आरक्षण होते. त्याचे प्लॉट पाडून एमआयडीसीने विकले. त्यामुळे येथे काहीच विकासकामे करता येत नसल्याची तक्रार नगरसेवक करत आहेत. या ठिकाणी ठेकेदार काम करायला पुढे येत नाहीत. तिन्ही झोपडपट्ट्यांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे.
कचऱ्याची समस्या मोठी आहे. दररोज वाढणाऱ्या झोपडपट्ट्यांवर कोणाचाही अंकुश नाही. महापालिका प्रशासन याबाबत ढिम्म आहे. त्यामुळे कितीही समस्यांचे निराकरण केले, तरी समस्या सुटणार नाहीत, अशीच परिस्थिती शहरातील झोपडपट्ट्यांची झाली आहे. झोपडपट्ट्यांमध्ये दादागिरी, गुंडगिरी वाढत चालली आहे. या प्रकाराला राजाश्रय मिळत असल्याने अनेक गैरप्रकार घडत आहेत. मात्र, येथील दोन्ही नगरसेवक वेगवेगळ्या पक्षांतील असूनसुद्धा समन्वय चांगला आहे. (वार्ताहर)

Web Title: Increased slums due to lack of administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.