सीएनजी दरवाढीने मोडणार ‘पीएमपी’चे कंबरडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 09:28 PM2018-10-04T21:28:07+5:302018-10-04T21:31:23+5:30

डिझेल दरवाढीने आधीच मोठा बोजा पडत असताना आता पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) सीएनजी गॅस दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे.

increasing CNG price loss of PMP | सीएनजी दरवाढीने मोडणार ‘पीएमपी’चे कंबरडे

सीएनजी दरवाढीने मोडणार ‘पीएमपी’चे कंबरडे

Next
ठळक मुद्देमागील काही महिन्यांपासून वाढत असलेल्या डिझेल दरामुळे मोठा आर्थिक फटका संबंधित इंधन कंपनीकडून पीएमपीसाठी पंधरा दिवसांनी दर निश्चित

पुणे : डिझेल दरवाढीने आधीच मोठा बोजा पडत असताना आता पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) सीएनजी गॅस दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे. हे दर शुक्रवार (दि. ५) पासून प्रतिकिलो तीन रुपयाने वाढणार असल्याने दररोज सुमारे दोन कोटी रुपयांचा भार पीएमपीवर पडणार आहे. दरम्यान, पीएमपीला मागील काही महिन्यांपासून वाढत असलेल्या डिझेल दरामुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे. मागील महिनाभरात डिझेलचे दर सव्वा सहा रुपयांनी वाढले. त्यामुळे पीएमपीच्या तोट्यात वाढ झाली आहे. त्यातच आता सीएनजीचे दर वाढविण्याचा निर्णय संबंधित कंपनीने घेतला आहे. यापुर्वी पीएमपीला ५२ रुपये प्रति किलो दराने सीएनजी मिळत होता. गुरूवारपासून तीन रुपये दरवाढ झाल्याने ५५ रुपयाने मिळणार आहे. पीएमपीच्या ताफ्यात सध्या एकुण १२२४ सीएनजीवर चालणाºया बस आहेत. त्यैपीक ५६४ बस पीएमपीच्या मालकीच्या तर उर्वरीत बस भाडेतत्वावरील आहेत. या सर्व बसला दररोज सुमारे ६२ हजार किलो गॅस लागतो. या गॅससाठी दररोज सुमारे ३२ लाख २४ हजार रुपये खर्च येत होता. दरवाढीमुळे त्यात सुमारे १ लाख ८६ हजार रुपयांची भर पडणार आहे.
दरम्यान, डिझेलच्या दरात केंद्र सरकारने अडीच रुपये कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पीएमपीला मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, कमी झालेल्या दराने डिझेल मिळण्यासाठी पीएमपीला काही दिवस वाट पाहावी लागेल अशी शक्यता आहे. संबंधित इंधन कंपनीकडून पीएमपीसाठी पंधरा दिवसांनी दर निश्चित केले जातात. तीन दिवसांपुर्वीच हा दर निश्चित झाला आहे. त्यामुळे आता आणखी दहा दिवसांनीच दर कमी होण्याची शक्यता असल्याचे समजते.
------------------------- 
एकुण सीएनजी बसेसची संख्या - १२२४ 
ठेकेदार - ६६०
पीएमपी - ५६४ 
दैनंदिन सीएनजी गरज- ६२ हजार किलोग्रॅम  
दैनंदिन खर्च - ३२ लाख २४ हजार 
नव्या दरानुसार खर्च - ३४ लाख १० हजार 
अतिरीक्त भार - १ लाख ८६ हजार
 

Web Title: increasing CNG price loss of PMP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.