देशात सांप्रदायिकता पसरवणे धोकादायक

By admin | Published: November 15, 2015 12:42 AM2015-11-15T00:42:44+5:302015-11-15T00:42:44+5:30

सनातनी विचारांच्या संघटना देशात सांप्रदायिकता पसरवत आहेत. मात्र केंद्र सरकारकडून त्यांच्यावर कोणतेही निर्बंध आणले जात नाहीत. ही बाब गंभीर आहे, असे मत आमदार आजित पवार यांनी व्यक्त केले.

Increasing communalism in the country is dangerous | देशात सांप्रदायिकता पसरवणे धोकादायक

देशात सांप्रदायिकता पसरवणे धोकादायक

Next

माळेगाव : सनातनी विचारांच्या संघटना देशात सांप्रदायिकता पसरवत आहेत. मात्र केंद्र सरकारकडून त्यांच्यावर कोणतेही निर्बंध आणले जात नाहीत. ही बाब गंभीर आहे, असे मत आमदार आजित पवार यांनी व्यक्त केले.
पवार पणदरे येथे स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
पवार म्हणाले, केंद्र व राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर सनातनवादी संघटना सांप्रदायिकता पसरवू पाहत आहेत. ज्या नथुराम गोडसेने महात्मा गांधीजींची हत्या केली त्या गोडसेच्या फाशीच्या दिवसाला हे लोक बलिदानदिन म्हणून साजरा करू पाहत आहेत. या वेळी संभाजी होळकर, बाबा पाटील, विलास जगताप, एम. एन. जगताप, अनिल जगताप, सुदामराव जगताप, रामभाऊ कोकरे, रमेश कोकरे, सत्यजित जगताप, जवाहर वाघोलीकर, अ‍ॅड. केशवराव जगताप, भगत जगताप, नारायण कोकरे, उपस्थित होते.
कालव्याची सफाई लोकसहभागातून
पणदरे गावातून जाणाऱ्या नीरा डाव्या कालव्याची दुरवस्था झाली आहे. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत अजित पवार यांनी गावातील लोकांना एकत्र येत लोकसहभागातून कालव्याची साफसफाई व डागडुजी करण्याचे आवाहन केले आहे.
पुरातन वास्तूंचे
जतन करा
पणदरे गावाला मोठ्या प्रमाणावर प्राचीन व ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मात्र, गावामध्ये इतिहासकालीन वाडे पाडून इमारती उभारल्या जात आहेत. त्याऐवजी अशा वास्तुंचे नूतनीकरण करून त्याचे प्रेक्षणीय स्थळ कसे बनविता येईल, याकडे लक्ष द्यायला हवे. यावर विचार व्हायला हवा, असे आवाहन पवार यांनी केले.
काळूस : काळूस (ता. खेड) परिसरातील भीमा नदीपात्रातील ४ कृषिपंपांची चोरी झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. ही घटना काल (दि. १३) रात्रीच्या सुमारास घडली. तर, वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांत संतापाचे वातावरण आहे. काळूसच्या उत्तरेकडील वाटेकरवाडी, निमगाव बंधारा परिसरातून कृषिपंपाच्या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी वैतागला आहे. भीमा नदीपात्रातून शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या ४ कृषिपंपांची मागील महिन्यात चोरी झाली होती. याच भागातून पुन्हा काल रात्री ४ कृषिपंप चोरट्यांनी चोरून नेले. सुमारे ७.५ ते १० अश्वशक्तीच्या पंपांच्या चोरीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याबाबत बबन जाचक, दशरथ जाचक, वसंत आरगडे, हनुमंत आरगडे, भिवाजी पवळे यांनी चाकण पोलिसात तक्रार दाखल केली आहे. हे प्रकार या भागात वारंवार होत असून, यापूर्वी तांब्यांच्या तारांची चोरी होई. पण आता पूर्ण संचच चोरी होत असल्याचे ग्रामपंचायत सदस्य पवनराजे जाचक यांनी सांगितले.

Web Title: Increasing communalism in the country is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.