चॉकलेट केकला वाढती मागणी

By admin | Published: December 22, 2016 02:35 AM2016-12-22T02:35:49+5:302016-12-22T02:35:49+5:30

ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सगळीकडे जय्यत तयारी सुरू असून, केकला मागणी वाढत आहे. कॅम्प, पुणे स्टेशन

Increasing demand for chocolate cake | चॉकलेट केकला वाढती मागणी

चॉकलेट केकला वाढती मागणी

Next

पुणे : ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सगळीकडे जय्यत तयारी सुरू असून, केकला मागणी वाढत आहे. कॅम्प, पुणे स्टेशन, एम. जी. रस्ता येथील केक शॉपमध्ये गर्दी होऊ लागली आहे.
फे्रश, मार्बल, रमबॉल चॉकलेट, रेम्बो फीस्ट, ख्रिस स्मल प्लाप्स, सेलिब्रेशन ख्रिसमस, सांता अशा अनेक प्रकारांंमधील केक खास ठरत आहेत. त्यातही वेगळ्या प्रकारचे ‘प्लम केक’ व ‘वाइन केक’ला पसंती मिळत आहे. या केकमध्येही ड्रायफ्रूट, रिच प्लम आणि चॉकलेट यासारखे फ्लेवर केक उपलब्ध आहेत.
ख्रिसमसचे औचित्य साधून ग्राहकांच्या पसंतीप्रमाणे केकचे प्रकार बनविले जात आहेत. त्यामध्ये ख्रिसमस लॉग, डेट अँड वोल्नट, फ्रूट केक, चॉकलेट, कँडल केक अशा प्रकारांमधील केकही तयार केले जात आहेत. ५० ग्रॅमपासून चार किलोंपर्यंतच्या वजनाचे हे केक तयार करण्यात येत आहेत. यासाठी मात्र आॅर्डर द्यावी लागते.
ख्रिसमसनिमित्त बनविण्यात येणाऱ्या कप केकपासून डिझायनर केकपर्यंतचे अनेक पर्याय बाजारपेठेत उपलब्ध आहेत. साधारणत: २५ रुपयांपासून दीड-दोन हजार रुपयांपर्यंत अशी किमत आहे.
ख्रिसमसनिमित्त होणाऱ्या पार्ट्यांसाठी ‘कप केक’ हा चांगला पर्याय ठरत आहे. यामध्ये व्हॅनिला, चॉकलेट, चोको-चिप्स, रेड वेल्वेट, चोको लावा, वॉल्नट ब्राउनी, आमंड विथ कोकोनट बिस्किट आणि स्लाइस केक असे पर्याय आहेत.
(प्रतिनिधी)

Web Title: Increasing demand for chocolate cake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.